कळमनुरी/हिंगोली (Hingoli Andolan) : हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहे तसेच वाळू माफियांच्या दादागिरीमुळे जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी भयभीत झाले आहेत त्यामुळे येत्या पंधरा दिवसात हे आवेदन दे बंद न झाल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने (Hingoli Andolan) जिल्हावर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा (Hingoli Police) पोलीस अधीक्षक कार्यालयात दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वाळुमाफियांची दादागिरी मोडीत काढुन महसूल कर्मचारी व नागरिकांचे मनोबल वाढवणे व मागील काही दिवसांपासून अवैध धंद्यांना उत आला असून गुटखा,मटका,जुगार,वाळू तस्करी अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे औंढा तालुक्यामध्ये याचे प्रमाण सर्वाधिक असुन महसूल कर्मचारी आणि सामान्य नागरिक यांना भयभीत जीवन जगावे लागत आहे येत्या 15 दिवसात अवैध धंदे बंद न केल्यास (Ubhata Andolan) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाभर आंदोलन छेडले जाईल असा इशारा आज पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली येथे (Hingoli Police) हिंगोली जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी शिवसेना (Ubhata Andolan) हिंगोली जिल्हाप्रमुख अजय ऊर्फ गोपु पाटील यावेळी मा.आ.डॉ.संतोष टारफे,जिल्हाप्रमुख संदेश देशमुख,जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, शिवसेना नेते अजितभाऊ मगर,लोकसभा सहसंपर्कप्रमुख डॉ. रमेश शिंदे,उपजिल्हाप्रमुख उध्दवराव गायकवाड, उपजिल्हाप्रमुख जि.डी. काका मुळे,उपजिल्हाप्रमुख गणेश शिंदे,उपजिल्हासंघटक सोपान पाटील,शंकरराव घुगे,अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख अब्दुल्ला पठाण, दलित आघाडी जिल्हाप्रमुख कैलास खिल्लारे, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, तालुकाप्रमुख भानुदास जाधव,तालुकाप्रमुख आनंदराव जगताप, तालुकाप्रमुख गणेश देशमुख,सभापती मारोतराव खांडेकर,मा.जि.प. सदस्य नागोराव करंडे,तालुका संघटक बाळासाहेब गावंडे, पंढरीनाथ ढाले पाटील,उपतालुकाप्रमुख रूपेश देशमुख, डॉ.चंद्रमुनी पाईकराव,चांदू पाटील भिसे, तालुकासचिव अमोल काळे,मा. नगरसेवक राजू संगेकर, सर्कलप्रमुख बाबुराव सुकळकर, उत्तमराव उगले,नारायण काशीद, विलास जवादे,गजानन अवचार, किशन हमादे,पोले,बाळापूर शहरप्रमुख सचिन पाटील,संतोष सुर्यवंशी,उध्दव कदम व इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते