हिंगोली(Hingoli):- हिंगोली शहरातील अनुराधा अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड हिंगोली शाखेत 4038 ठेवीदारांनी गुंतवणूक केलेल्या 6 कोटी 27 लाख 65 हजार 130 रुपयाच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेच्या अध्यक्षासह संचालक मंडळ व कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा (Crime of Fraud)दाखल करण्यात आला आहे.
अध्यक्षासह संचालक मंडळ व कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
हिंगोली येथे मागील काही वर्षांपूर्वी अनुराधा अर्बन को आप क्रेडिट सोसायटी लि शाखा उघडण्यात आली होती. या पतसंस्थेत अध्यक्ष व संचालक मंडळाने २४ डिसेंबर २०१९ ते २४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ठेवीदारांना फिक्स डिपॉझीट(Fixed Deposit) व ईतर गुंतवणुकीवर इतर संस्थेच्या तुलनेत जास्तीचे म्हणजेच 10 ते 12 पर्यंत परतावा देण्याचे आमीष दाखविले. त्यामुळे 4038 ठेविदारांनी त्यांची 6 कोटी 27 लाख 65 हजार 130 रुपयांची रक्कम संस्थेच्या विविध प्रकारच्या ठेवी मध्ये गुंतवली होती.
संस्थेची मुदत ठेवीची रक्कम तारण कर्जाद्वारे परस्पर उचलुन अपहार
मात्र ठेविदारांच्या रकमेचा अपहार करण्याच्या उद्देशाने आरोपीतांनी बनावट ठराव व बनावट कर्ज प्रकरण तयार करुन त्यावर बनावट स्वाक्षऱ्या करून त्याआधारे संस्थेची मुदत ठेवीची रक्कम तारण कर्जाद्वारे परस्पर उचलुन अपहार केला. याच दरम्यान काही खातेदारांनी पतसंस्थेत त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम मागण्यास सुरुवात केली परंतु ही रक्कम मिळेनाशी झाली. त्यामुळे पतसंस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची डोकेदुखी अधिक वाढली त्यामुळे कर्मचाऱ्याने या संदर्भात मागील काही महिन्यापूर्वी तक्रार केली होती. त्यानंतर पतसंस्थेचे लेखापरीक्षण करण्यात आले असता त्यात अपहार झाल्याचे उघड झाले.
आरोपींविरुद्ध विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल
या प्रकरणी लेखापरीक्षक अनिल पारप्पा बंधू यांनी हिंगोली शहर पोलिस(Hingoli City Police) ठाण्यात तीन मे रोजी रात्री उशिरा तक्रार दाखल (Complaint filed)केली. यावरून पोलिसांनी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक वामनराव कांबळे, (रा.गोपाल टॉकीज जवळ वाशिम ह.मु. तापडीया इस्टेट हिंगोली), सचिव मोहन मनीराम सोनटक्के रा. जवाहार कॉलनी आय. यु.डी.पी. कॉलनी वाशिम, संचालिका अनुराधा वामनराव कांबळे, सिमा अशोक कांबळे, (रा. वाशीम), बाजीराव माणिकराव शैकू, मनीषा मनोज डोळसकर उर्फ मनीषा पिता सुभाष कल्याणकर, मोहम्मद साजीद अब्दूल खदीर (रा. हिंगोली), तेजस्वीता राजेंद्र शेगोकार (रा. वाशीम), व्यवस्थापक प्रदिप कृष्णराव पत्की, पासिंग ऑफिसर मोतीराम चंपती जगताप, शुभम राजू घाटोळ (रा. हिंगोली) यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा (Crime of Fraud)दाखल केला आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक एन. बी. काशीकर यांच्याकडे सोपविला आहे.