गतवर्षी ६ लाख ८१ हजाराचे आगाराला झाले होते उत्पन्न
हिंगोली (Hingoli Ashadhi Ekadashi ) : आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी व भाविकांसाठी पंढरपुरला जाण्यासाठी हिंगोली आगारा तर्फे ३६ बसेसचे नियोजन केले होते. गतवर्षी प्रमाणे यावर्षीही हिंगोली आगाराला आषाढीवारी पावल्याने ६ लाख ८८ हजार रूपयाचे मिळाल्याची माहिती आगार प्रमुख सूर्यकांत थोरबोले यांनी दिली आहे. (Ashadhi Ekadashi) आषाढी एकादशी निमित्ताने राज्याच्या कानाकोपर्यातून लाखो वारकरी व भाविक पंढरपूर नगरीत विठ्ठलाच्या दर्शनाकरीता गेले होते.
हिंगोली आगारा तर्फे २२ ते २४ जुलै दरम्यान ३६ बसेस सोडल्या होत्या त्याच्या ९४ फेर्या झाल्या. बसेसचे ३४३१० कि.मी.अंतर झाले असून भारमन २९ आले आहे. पंढरपुरला ७ हजार १०० भाविक गेल्याने आगाराला ६ लाख ८८ हजाराचे उत्पन्न झाले आहे. गतवर्षी हिंगोली आगारा तर्फे बसेसच्या १०२ फेर्या झाल्या होत्या. त्याचे ३७ हजार कि.मी.अंतर झाले तर ८ भारमन आले आहे. ६ हजार ९०० प्रवाशांनी पंढरपुरला विठ्ठलाचे दर्शन घेतल्याने आगाराला ६ लाख ८१ हजाराचे उत्पन्न झाले होते. विशेष म्हणजे गतवर्षीपेक्षा यावर्षी हिंगोली आगाराचे उत्पन्न वाढले. दर्शनाला जाणार्यांमध्ये वयोवृद्धांचे प्रमाण अधिक होते. गतवर्षी गुरूपौर्णिमेला तर यावर्षी आषाढीला भाविक मोठ्या संख्येने गेले होते.