मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न
हिंगोली (Hingoli Assembly election) : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत (Hingoli Assembly election) मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी स्वीप पथकाच्या माध्यमातून मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने ‘मतदान जनजागृती रथा’च्या माध्यमातून कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर विविध प्रकारचे संदेश देत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. या रथाला हिरवी झेंडी दाखवून जिल्हा नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के आणि प्रशांत दिग्रसकर यांनी मोहिमेवर रवाना केले.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 मध्ये हिंगोली लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदानामध्ये वृद्धी करण्यासाठी हे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात (Hingoli Assembly election) मतदानाची टक्केवारी वाढावी; या सार्वत्रिक निवडणुकीत किमान 75 टक्के मतदान व्हावे, असा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे या निवडणुकीत जिल्ह्यातील 5 लक्ष 9 हजार 17 पुरुष आणि महिला 4 लक्ष 72 हजार 403 मतदार असे एकूण 9 लक्ष 81 हजार 430 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही या जनजागृती रथाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
याप्रसंगी तालुका नोडल अधिकारी नितीन नेटके, जिल्हा स्वीपचे सदस्य विजय बांगर, बालाजी काळे, कोकरे तसेच 94-हिंगोली विधानसभा (Hingoli Assembly election) स्वीप सदस्य संजय मेथेकर, विनोद चव्हाण, सुदर्शन सोईतकर, माणिक ढोकळे, राजकुमार मोरगे आणि श्याम स्वामी तसेच पंचायत समिती हिंगोली आणि जिल्हा परिषद हिंगोली येथील कर्मचारी उपस्थित होते.