सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथील घटना
हिंगोली (Hingoli Assembly election) : सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे काही जणांनी राजकीय पक्षाच्या प्रचाराची गाडी अडविल्याने सेनगाव पोलिसात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रचाराच्या रणधुमाळीत हिंगोली जिल्ह्यात गुन्हा दाखल
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की सध्या (Hingoli Assembly election) विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे. आज 4 नोव्हेंबरला नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. ज्या राजकीय पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत अशा उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे त्यासाठी काही उमेदवारांनी गावोगावी प्रचाराचे रथ रवाना केले आहेत सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे उमेदवाराच्या प्रचाराचा रथ गेला असता काही जणांनी तो अडविला. त्यामुळे या प्रकरणात सेनगाव पोलीस ठाण्यात राजुदास जाधव यांनी तीन नोव्हेंबरला फिर्याद दिली.
ज्यामध्ये केशव मुळे संदीप गायकवाड तानाजी साबळे वैभव साबळे व त्यांच्यासोबत अन्य दोन ते तीन जणांनी बेकायदेशीर त्या गैरकादेशी मंडळी जमून जिल्हाधिकारी व मुंबई पोलीस कायद्याचे उल्लंघन करून राजकीय पक्षाच्या प्रचाराचा रथ अडविल्याने विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Hingoli Assembly election) विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे परंतु प्रचाराचे वाहन अडविल्याने हिंगोली जिल्ह्यात हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही काही ठिकाणी अशाच पद्धतीचे वाहन काही ग्रामस्थांनी प्रचार करताना आढळून ते परत पावली पाठविल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र फिरत आहेत.
फिर्यादी म्हणतात गुन्हा दाखल झालाच नाही
सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे काहीजणांनी प्रचाराचा रथ अडविल्याने यासंदर्भात राजुदास जाधव यांच्याकडे भ्रमणध्वनीवर विचारणा केली असता त्यांनी मात्र मला काहीच माहिती नाही आणि गुन्हा दाखल झालाच नाही असे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला. जेव्हा की फिर्यादी तेच असतांना त्यांनी नेमके हा प्रकार लपविण्याचा कशामुळे केला याचा उलगडा मात्र गुलदस्त्यातच आहे.