देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Assembly Election: मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करा: विभागीय आयुक्त दिलीप गावडे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Assembly Election: मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करा: विभागीय आयुक्त दिलीप गावडे

admin1
Last updated: 2024/11/14 at 8:05 PM
By admin1 Published November 14, 2024
Share
Hingoli Assembly Election

विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा

हिंगोली (Hingoli Assembly Election) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी काळजीपूर्वकपणे काम करावे. जिल्ह्यात येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत (Hingoli Assembly Election) मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक यंत्रणेने विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे (Dilip Gawde) यांनी आज येथे दिल्या.

सारांश
विधानसभा निवडणूक तयारीचा आढावासर्वांनी योग्य समन्वयातून जबाबदारी पार पाडामतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना

सर्वांनी योग्य समन्वयातून जबाबदारी पार पाडा

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित विधानसभा निवडणूक (Hingoli Assembly Election) तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी श्रीमती मंजुषा मुथा यांच्यासह नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Hingoli Assembly Election
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची कमी टक्केवारी पाहता बुधवारी होणाऱ्या निवडणुकीत (Hingoli Assembly Election) त्यात वाढ करण्याबाबतच्या सूचना देताना, मतदारांना मतदान केंद्राच्या ठिकाणी जास्त वेळ वाट पाहण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यांना काही मोजक्या मतदारांना एकत्र मतदान केंद्रांमध्ये पाठविण्याबाबतची सुविधा देता येईल, यादृष्टीने नियोजन करण्याबाबतच्या सूचना दिल्या. मतदानाची टक्केवारी वाढविण्याकामी मतदार जनजागृतीवर विशेष भर देण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त दिलीप गावडे (Dilip Gawde) यांनी दिले.

मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना

टपाली मतपत्रिकांची देवाण-घेवाण करताना आवश्यक मनुष्यबळासह यावे. डिस्पँच सेंटर, रिसिप्ट, ट्रेनिंग आणि स्ट्रॉंगरूमची तयारी झाल्याबाबत माहितीही त्यांनी जाणून घेतली. स्वीपच्या माध्यमातून मतदार जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात यावेत. (Hingoli Assembly Election) मतदानाच्या दिवशी व्होटर टर्नआऊट अँपवर मतदानाच्या टक्केवारीची तात्काळ माहिती भरावी, त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त गावडे (Dilip Gawde) यांनी दिले. तसेच आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, प्रसारमाध्यमांमध्ये पेड न्यूज येणार नाहीत, याबाबतची खबरदारी घेण्यासोबतच समाजमाध्यमांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

निवडणूक प्रचारात, तसेच मतदानाचा जाहीर प्रचार संपल्यानंतर कोणत्याही प्रकारे आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मतदान प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी, तसेच मद्य, पैसे याचे वाटप होवू नये, यासाठी पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घ्यावी. भरारी पथके, स्थिर निगराणी पथकांच्या माध्यमातून मोहीम स्वरुपात तपासणी करून आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे होईल, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त यांनी केल्या. मतदार जागृतीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

नवमतदार तसेच महिला यांच्यामध्ये जागृती करून त्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे 100 टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी सांगितले. (Hingoli Assembly Election) लोकसभेतील राज्याच्या सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, अशा मतदान केंद्रावर विशेष पथके नेमून मतदार जागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात ठिकठिकाणी आंतरजिल्हा तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी केली जात आहे. यासोबतच पोलीस दलामार्फत अचानक तपासणी मोहीम राबवून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात आहे. (Hingoli Assembly Election) कळमनुरी विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. यासोबतच अवैध मद्यसाठे, पैसा जप्त करण्यासाठीही शोध मोहीम राबविण्यात आली आहे. पिस्तुलसह विविध शस्त्रे तपासणी मोहिमेमध्ये जप्त करण्यात आली आहेत. यासोबतच मतदान कक्ष, मतदान यंत्र सुरक्षा कक्ष आदी ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पथक प्रमुखांनी त्यांच्या कामकाजाबाबतची माहिती विभागीय आयुक्तांना दिली.

You Might Also Like

Trader Accidental Death: अज्ञात वाहनाच्या धडकेत व्यापाऱ्याचा मृत्यू

Parbhani Woman Death: परभणीच्या शिंगणापुर शिवारात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

Ubatha Shiv Sena: परभणीत बँकेने त्या शेतकर्‍याचे सोने केले परत; दोन वर्षानंतर मिळाला न्याय

Police Attack: परभणीत स्कॉर्पिओने पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; एक ताब्यात तिघे पसार!

Sand Smuggling: म्हाळसगाव शिवारात अवैध वाळू वाहतुकीचे वाहन पकडले; दोघांवर गुन्हा दाखल!

TAGGED: Dilip Gawde, Divisional Commissioner, Hingoli Assembly election
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
क्राईम जगतपरभणीशेती

Parbhani: पाण्याची मोटार चालू करताना विजेचा धक्का; युवकाचा मृत्यू

Sanjay Sanjay May 29, 2024
Karanja-Manora Assembly: काहींचा राजीनामा तर अनेकांचा पक्षप्रवेश
Chala Januya Nadila: हिंगोलीला पूर आणि दुष्काळमुक्त करण्यासाठी वाहून जाणारे पाणी आडवा: राजेंद्रसिंह राणा
Latur: निलंगा महसूल प्रशासनाची डोळ्यांवर पट्टी; जिल्हाधिकारी लक्ष देतील का?
Parbhani: शक्ती प्रदर्शन करत आ. रत्नाकर गुट्टे यांनी भरला उमेदवारी अर्ज
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Trader Accidental Death
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trader Accidental Death: अज्ञात वाहनाच्या धडकेत व्यापाऱ्याचा मृत्यू

December 11, 2025
Parbhani Woman Death
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Woman Death: परभणीच्या शिंगणापुर शिवारात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

December 11, 2025
Ubatha Shiv Sena
मराठवाडापरभणीराजकारण

Ubatha Shiv Sena: परभणीत बँकेने त्या शेतकर्‍याचे सोने केले परत; दोन वर्षानंतर मिळाला न्याय

December 11, 2025
Police Attack
मराठवाडापरभणी

Police Attack: परभणीत स्कॉर्पिओने पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; एक ताब्यात तिघे पसार!

December 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?