आतापर्यंत 9 लक्ष 12 हजार मतदारांना झाले वाटप
हिंगोली (Hingoli Assembly Election) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची जिल्हा निवडणूक प्रशासनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, उद्या सोमवार, (दि.18) रोजी सायंकाळी 5 वाजता प्रचार थांबणार आहे. जिल्ह्यातील तीनही (Hingoli Assembly Election) विधानसभा मतदार संघात प्रत्येक मतदाराला मतदार चिट्ठी (पोलचीट) पोहचवण्याची जबाबदारी 1 हजार 15 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर (बीएलओ) सोपविण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 9 लक्ष 12 हजार 811 ओळखचिठ्ठयांचे वाटप झाले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी सांगितले.
92- वसमत विधानसभा मतदार संघात 327, 93- कळमनुरी विधानसभा मतदारसंघात 345 आणि 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी 343 केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) माध्यमातून या ओळखचिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात 9 लक्ष 84 हजार 764 मतदारांपैकी 9 लक्ष 12 हजार 811 ओळखचिठ्ठ्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये 92-वसमत विधानसभा मतदारसंघातील 3 लक्ष 20 हजार 765 मतदारांपैकी 2 लक्ष 97 हजार 712 ओळखचिठ्ठ्या वितरीत करण्यात आल्या आहेत. 93- कळमनुरी 3 लक्ष 30 हजार 686 मतदारांपैकी 3 लक्ष 6 हजार 449 तर 94 -हिंगोली विधानसभा मतदारसंघातील (Hingoli Assembly Election) 3 लक्ष 33 हजार 313 मतदारांपैकी 3 लक्ष 8 हजार 650 जणांपर्यंत ओळखचिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले आहे. ओळखचिठ्ठ्या वाटपाची एकूण टक्केवारी 92.69 अशी आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात 2 लक्ष 77 हजार 988 मतदार मार्गदर्शिका पुस्तिका (92.66%) वितरीत करण्यात आल्या असून, उर्वरीत ओळखचिठ्ठ्या वाटपाची प्रक्रिया सुरु असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी सांगितले.
निवडणुकीची (Hingoli Assembly Election) आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक पारदर्शक पध्दतीने पार पडावी, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. निवडणूकविषयक बैठका, प्रशिक्षण तसेच इतर कामे करण्यासाठी विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके २४ तास कार्यरत आहेत. तसेच महामार्ग वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. राजकीय पक्ष व उमेदवारांकडून बैठका, जाहीर सभा, कॉर्नर सभा आयोजित करताना आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रशासन २४ तास नजर ठेवून असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी सांगितले.