जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांचे मतदारांना आवाहन
हिंगोली (Hingoli Assembly Election) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बुधवार, दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात मतदान होणार आहे. जिल्ह्यातील तिन्ही (Hingoli Assembly Election) विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी केले आहे.
मतदारांनी 100 टक्के मतदान करण्यासाठी आपले योगदान द्यावे
राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची 15 ऑक्टोबर, 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 15 ऑक्टोबरपासून (Hingoli Assembly Election) जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्यासह पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाकडून निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे.
हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात (Hingoli Assembly Election) एकूण 1015 मतदान केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्याकामी मतदारसंघातील विविध अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी-कर्मचारी कर्तव्यावर आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात नवमतदारांनी आपले मतदान करत, आई-वडीलांना मतदान करण्यासाठी केंद्रापर्यंत पोहचवत 100 टक्के मतदान करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
निवडणूक आयोगही आता मतदारांच्या दारापर्यंत पोहोचत असून, लक्षात ठेवा, तुमचे मतदान भविष्य बदलू शकते…. ! मतदानाचा हक्क नक्की बजावा… !!, आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी संघटित होऊ या… ! चला मतदान करुया !! यासह विविध घोषवाक्याचे बॅनर लावून मतदान करण्याबाबत प्रशासनातर्फे जनजागृती करण्यात येत आहे.
निवडणूक आयोगही आता मतदारांच्या दारी पोहचला असून, निवडणूक यंत्रणा डोंगर-दऱ्या, नदी-नाले, काट्याकुट्याचे रस्ते तुडवत एकेक ज्येष्ठ व दिव्यांगांचे टपाली मतदान करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे तिन्ही (Hingoli Assembly Election) विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी. तसेच सर्वांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.