तिसऱ्या दिवशी हिंगोली जिल्ह्यात 58 अर्जांची उचल
हिंगोली (Hingoli Assembly Elections) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये आज हिंगोली जिल्ह्यात 28 इच्छुकांनी 58 अर्जांची उचल केली आहे. यामध्ये 92-वसमत विधानसभा मतदार संघात 8 जणांनी 8 अर्ज, 94-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 10 जणांनी 23 अर्ज व 94-हिंगोली विधानसभा (Hingoli Assembly Elections) मतदारसंघात 10 जणांकडून 27 अर्ज असे जिल्ह्यात एकूण 28 इच्छुकांकडून 58 अर्जांची उचल केली आहे. तर 92-वसमत विधानसभा मतदारसंघात गुरु पारदेश्वर शिवाचार्य महाराज (जनसुराज्य शक्ती पक्ष) यांनी 1, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात संतोष लक्ष्मणराव बांगर (शिवसेना) यांनी 1 अर्ज व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात तानाजी सखाराम मुटकुळे (भाजपा) यांनी 2, भाऊ पाटील गोरेगावकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांनी 1 असे एकूण 3 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.
वसमत येथे एक, कळमनुरी येथे एक, हिंगोली येथे तीन नामनिर्देशनपत्र दाखल
मंगळवार (दि.22) पासून राज्यात निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, नामनिर्देशन पत्र विक्री व दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी 153 अर्जांची विक्री झाली. दुसऱ्या दिवशी बुधवारी 123 तर आज तिसऱ्या दिवशी 28 इच्छुकांकडून 58 अर्जांची विक्री झाली आहे. अशा तीन दिवसात जिल्ह्यात 334 अर्जांची विक्री झाली आहे. मंगळवार, दि. 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत (Hingoli Assembly Elections) उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे.