हिंगोली (Hingoli Assembly Elections) : विधानसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघातील (Hingoli Assembly Elections) मतदान केंद्रावर वितरीत करावयाच्या मतदान प्रक्रियेत नियुक्त अधिकारी-कर्मचारी (पोलींग पार्टी) यांची आज निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव यांच्या उपस्थितीत सरमिसळीकरणाची प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक निरीक्षक (पोलीस) डॉ. राकेशकुमार बन्सल, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अब्दुल बारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ही सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यातून मतदानाच्या ठिकाणी अधिकारी-कर्मचारी व तो नियुक्त होत असलेल्या मतदारसंघात जाणार, हे निश्चित करण्यात आले. यानंतर शेवटची सरमिसळीकरणाची प्रक्रिया ही मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे 19 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे. तसेच यापुढे कोणत्याही निवडणूक कामी नियुक्त कर्मचाऱ्यास निवडणूक प्रक्रियेतून वगळणे अथवा ड्युटी रद्द करण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
भारत निवडणूक आयोगातर्फे विकसित संगणक प्रणालीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक (Hingoli Assembly Elections) कामी नियुक्त करण्यारत आलेल्या अधिकारी-कर्मचारी यांना पाठविण्यात येते.