भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे यांनी काढले पत्र
हिंगोली (Hingoli assembly elections) : सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या दरम्यान पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपावरून भाजपच्या तीन पदाधिकार्यांना जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे यांनी बडतर्फ केले आहे.
हिंगोली विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत (Hingoli assembly elections) पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या विरोधात पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे जिल्हा चिटणीस तथा विधानसभा बूथ संयोजक आशिष वाजपेयी, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष शेषराव रावजी कावरखे, हिंगोली शहर सरचिटणीस संदीप वाकडे या तिघांना बडतर्फ केल्याबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे यांनी काढले आहे.