हिंगोली (Hingoli Assembly) : ‘मी पक्षाच्या आदेशवर चालणारा कार्यकर्ता आहे, पक्षाने मला (Hingoli Assembly) हिंगोलीतून विधानसभेची निवडणूक लढविण्याचे आदेश दिल्यास माझी तयारी आहे’ अशा शब्दांत भाजपचे लोकसभा प्रमुख (Ramdas Patil) रामदास पाटील सुमठाणकर यांनी कबुली दिली.
भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी सनदी अधिकारी रामदास पाटील यांनी ‘एक झाड आईच्या नावाने’ असा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत ११ हजार झाडे लावली जाणार असून पहिल्या टप्प्यात पाच हजार झाडांचे वितरण करणार असल्याचे ते म्हणाले. पावसाळ्यात वृक्षारोपण झाल्यानंतर पुढे वर्षभर रोपट्यांना टँकरद्वारे पाणी सुद्धा दिले जाणार असल्याची माहिती पाटील (Ramdas Patil) यांनी दिली.
रामदास पाटील (Ramdas Patil) यांनी लोकसभा मतदार संघात मोठा जनसंपर्क तयार केला होता. ऐनवेळी हिंगोलीची जागा मित्र पक्षाला सोडल्यामुळे त्यांची संधी हुकली तेव्हापासून त्यांच्या बाबत अन्याय झाल्याचे भावना जनसामान्यांत आहे. ते विधानसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा असल्याने पत्रकारांनी छेडले असता त्यांनी (Hingoli Assembly) हिंगोलीतून विधान सभेची निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली. त्यांच्या कार्यकाळात हिंगोलीत झालेल्या कामांमुळे शहरातील जनतेच्या मनात त्यांनी स्थान निर्माण केले आहे.