हिंगोली (Hingoli Bandh) : परभणी येथे संविधान प्रतीकृती विटंबनेच्या घटनेप्रकरणी १२ डिसेंबरला हिंगोली बंदची हाक देण्यात येऊन निषेध नोंदविला. हा बंद संविधान प्रेमींनी सर्वत्र शांततेत संपूर्ण दिवसभर कडकडीत बंद ठेवून पाळल्याने व्यापार्यांनीही या बंदला चांगला प्रतिसाद दिला. कुठेही अनुचित घटना घडू नये या दृष्टीने सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
१२ डिसेंबर रोजी सकाळीच हिंगोलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अनेक संविधानप्रेमी उपस्थित झाले होते. व्यापार्यांनीही सकाळपासूनच आपापली प्रतिष्ठाणे बंद ठेवली होती. महात्मा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, जवाहर रोड, छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा, अकोला बायपास, नांदेड बायपास, बसस्थानक रोड यासह भाजी बाजार आदी ठिकाणी व्यापार्यांनी (Hingoli Bandh) कडकडीत बंद ठेवला होता. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीने देखील शेतीमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवले होते.
केवळ औषधी दुकाने, रूग्णालय तसेच काही महत्वाच्या बँका वगळता (Hingoli Bandh) सर्वत्र कडकडीत बंद होता. बंद दरम्यान परभणी सारखी हिंसक घटना घडू नये म्हणून खबरदारीच्या उपाय योजनेसाठी संविधान प्रेमींनी डॉ.आंबेडकर पुतळ्या समोरच मागण्यांचे निवेदन प्रशासनामार्फत राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना पाठविले. हे निवेदन उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांनी स्विकारले. यावेळी दोन लहान मुलांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले.
परभणी येथील घडलेल्या संविधान प्रतीकृतीची विटंबना केलेल्या घटनेची सीबीआय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, प्रकरणातील मुख्य आरोपीविरूद्ध संविधान प्रतीकृतीच्या विटंबनेबाबत राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, परभणी येथे झालेल्या जाळपोळ व दंगली संदर्भात निरपराध लोकांना घरात घुसून त्यांची धरपकड केली जात आहे ती थांबविण्यात यावी, भविष्यात अशा घटना घडू नये.
यासाठी प्रशासनाने पावले उचलण्यात यावीत असे निवेदन नमूद केले होते. निवेदनावर मधुकर मांजरमकर, दिवाकर माने, रविंद्र वाढे, प्रकाश इंगोले, दिपक सोनवणे, योगेश नरवाडे, नितीन खिल्लारे, दिलीप भिसे, मिलींद उबाळे, ज्योतीपाल रणवीर, लखन खंदारे, अक्षय इंगोले, निखिल खिल्लारे, रावण धाबे, प्रितम सरकटे, आनंद खिल्लारे, विक्की भालेराव, राहूल पुंडगे, संदीप भुक्तार, विशाल इंगोले, विनोद भालेराव, नागेश धुळे, प्रा. यु. एच. बलखंडे, मिलींद कवाने, अॅड.आनंद खिल्लारे, तारा खंदारे, इंदूमती मोमडे, संध्या केदार (कानेकर), अनिता वाठोरे, अंजली इंगोले, डॉ.स्वप्नील इंगळे, प्रकाश राऊत, सचिन तपासे, प्रकाश पठाडे, अॅड.एस.एस.तांगडे-अहिरे आदींच्या स्वाक्षर्या आहेत. या बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये या दृष्टीने जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी राज्य राखीव पोलीस बल व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले होते.