हिंगोली (Hingoli) :- संजय गांधी निराधार (Sanjay Gandhi niradhaar) अनुदान, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत आतापर्यंत ९४७ लाभार्थ्यांचे बँक खाते डिबीटी (DBT)जमा झाले नसल्याने त्यांनी तात्काळ बँकेत डिबीटी करावी १५ फेब्रुवारी पर्यंत डिबीटी न झाल्यास लाभार्थ्यांना अनुदान मिळणार नाही असा इशारा तहसिलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिला आहे.
तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांचा इशारा
हिंगोली तहसील अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या(Government of Maharashtra) सामाजिक न्याय विभागाने दिलेल्या आदेशान्वये अनुदान लाभार्थ्यांना दिले होते. परंतु यापुढे फक्त डिबीटी थेट लाभ हस्तांतरण प्रणालीव्दारे दोन्ही योजनेचे अनुदान जमा होणार असल्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपले बँक खाते, आधार कार्ड व मोबाईल क्रमांकाशी सलंग्न करून घेणे बंधनकारक केले आहे. संजय गांधी निराधार योजनेतंर्गत हिंगोली तहसील अंतर्गत एकुण ४९९३ लाभार्थी आहेत.त्यापैकी ४७९६ लाभार्थ्यांची डिबीटी झाली आहे. त्यावर डिसेंबरचे अनुदान शासनामार्फत डिबीटीव्दारे वितरीत केले आहे. आता १९७ लाभार्थ्यांचे डिबीटी राहीले आहेत. श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती योजनेतंर्गत एकुण लाभार्थी ५२१६ असुन त्यापैकी ४४६६ लाभार्थ्यांची डिबीटी झाली आहे. त्यावर डिसेंबरचे अनुदान डिबीटीव्दारे वितरीत केले असुन अद्याप ७५० लाभार्थ्यांची डिबीटी होणे शिल्लक आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजनेचे डिबीटी न झालेले ९४७ लाभार्थी आहेत.
लाभार्थ्याचे बँक खाते डिबीटी नसल्यास त्यांनी आपले बँक खाते आधार व मोबाईल क्रमांकाशी सलंग्नीत करून घेण्याकरीता संबंधित बँकेत जाऊन एन.पी.सी.एल फार्म भरून डिबीटी करून घ्यावी व डिबीटी झाल्यानंतर लाभार्थ्यांचे झेरॉक्स आधार कार्ड, आधार सलंग्न बँक खाते पासबुक झेरॉक्स व आधार सलंग्न मोबाईल क्रमांक आदी माहिती जमा करावी. ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते १५ फेब्रुवारी पर्यंत डिबीटी केले जाणार नाही त्यांचे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतंर्गतचे मिळणारे अनुदान यापूढे जमा होणार नाही. असा इशारा तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिला आहे.