हिंगोली (Hingoli Bank) : शहरातील नवा मोंढा भागातील (Anuradha Urban bank) अनुराधा अर्बंन को.ऑप के.सोसायटी लि. मध्ये ४०३८ ठेवीदारांच्या ६ कोटी २७ लाख ६५ हजार १३० रुपयांच्या अपहार प्रकरणात अध्यक्षासह, संचालक व कर्मचारी अशा ११ जणांवर गुन्हा (Hingoli crime) दाखल झाला आहे. त्यातील चौघांनी अटक पुर्व जामिनसाठी अर्ज दाखल केला असता न्यायालयाने चौघांचा अटक पुर्व जामिन फेटाळला आहे.
या (Anuradha Urban bank) प्रकरणात पतसंस्थेचे संचालक मोहमद साजीद अब्दूल खदीर, संचालिका मनिषा मनोज डोळसकर, व्यवस्थापक प्रदीप कृष्णराव पत्की, रोखपाल शुभम राजू घाटोळ (रा. हिंगोली) यांना अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सादर केला होता. यावर सुनावणी होऊन न्यायाधिश आर. व्ही. लोखंडे यांनी चौघांचाही अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड. सविता देशमुख यांनी काम पाहिले. तर ठेवीदारांच्या वतीने अॅड. मनिष साकळे, अॅड. जे. एस. पठाण यांनी काम पाहिले.Hingoli