हिंगोली (Hingoli bazar Samiti) : शेती हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत नसल्याच्या कारणावरून हिंगोली बाजार समितीत (Hingoli Bazar Samiti) संचालक असलेल्या दोन शिक्षकांना जिल्हा उपनिबंधकांनी अपात्र ठरविले आहे. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात झाली आहे. या (Assembly Elections) निवडणुकीत डिग्रस कर्हाळे येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदावर असलेले शामराव जगताप व जयपूर येथील संगमेश्वर विद्यालयात मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले अशोक श्रीरामे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
या निवडणुकीत दोघेही विजयी झाले आहेत. सध्या श्रीरामे हे (Hingoli Bazar Samiti) बाजार समितीचे उपसभापती असून शामराव जगताप हे (Assembly Elections) विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीचे दावेदारही आहेत. जिल्हा उपनिबंधकांच्या या निर्णयामुळे सहकार क्षेत्रासहीत अन्य काही क्षेत्रात काम करणार्या नोकरदार राजकारण्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, उपसभापती श्रीरामे यांच्या विरुध्द शंकर पोले यांनी तर संचालक जगताप यांच्या विरुध्द परसराम राऊत यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अपील दाखल केले होते. या दोघांच्याही उत्पन्नाचा मुख्यस्त्रोत शेती नसल्याचे अपीलामध्ये नमुद केले होते. त्यासोबत त्यांनी दोघांचेही वेतन प्रमाणपत्र सोबत जोडले होते.
सदर प्रकरण जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एल. बोराडे यांच्या समोर सुनावणीसाठी आले होते. या प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर (Hingoli Bazar Samiti) बाजार समितीचे उपसभापती अशोक श्रीरामे व संचालक शामराव जगताप यांचे उत्पन्नाचे मुख्यस्त्रोत शेतीपासून नसल्याने त्यांनी बाजार समितीच्या संचालकपदी राहण्यास अपात्र ठरवित असल्याचा निर्णय जिल्हा उपनिबंधक डॉ. बोराडे यांनी दिला आहे. या शिवाय वरील निर्णयाविरुध्द ३० दिवसांच्या आत विभागीय सहनिबंधक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे दाद मागता येणार असल्याचे निर्णयात नमुद केले आहे.