हिंगोली (Hingoli BJP) : माजी केंद्रीय मंत्री तथा हिंगोली लोकसभा (Hingoli Lok Sabha) मतदार संघाच्या माजी खासदार सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली असून (BJP) भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सूर्यकांता पाटील यांनी सन १९८० ते १९८५ या दरम्यान हदगाव विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे आमदार म्हणून काम पाहिले. त्यानंतर सन १९८६ ते १९९१ या दरम्यान राज्यसभा सदस्य म्हणून होत्या. नांदेड लोकसभा निवडणुकीत सन १९९१ ते १९९६ मध्ये त्यांनी विजय मिळविला होता. सन १९९६ मध्ये हिंगोली लोकसभा (Hingoli Lok Sabha) निवडणूक लढवून त्या विजयी झाल्या होत्या.
काँग्रेस पक्षाच्या विभाजनानंतर सन १९९९ मध्ये त्यांनी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सन २००४ मध्ये त्यांना (Hingoli Lok Sabha) हिंगोली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिल्यानंतर त्या निवडूण आल्या होत्या. त्याचवेळी त्यांना केंद्रात राज्यमंत्री पद मिळाले होते. सन २००९ मध्ये राकाँतर्फे त्यांनी निवडणूक लढविली असता त्या पराभूत झाल्या होत्या. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली विधानसभा मतदार संघ काँग्रेसला सुटल्याने स्व.खा. राजीव सातव यांना उमेदवारी दिली होती. (Sharad Pawar) शरदचंद्र पवार यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला असे विधान करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला होता. केंद्रीय माजीमंत्री राहिलेल्या (Suryakanta Patil) सूर्यकांता पाटील यांना भाजपात गेल्यानंतर हदगाव विधानसभा मतदार संघाचे संयोजक पद दिले होते. (BJP) भाजपात गेल्यापासून त्यांचे म्हणावे तसे मन रमत नव्हते. २२ जूनला माजीमंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपा प्राथमिक सदस्यत्वाचा व हदगावच्या संयोजक पदाचा राजीनामा दिल्याने नांदेड व हिंगोली जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का बसलो आहे.