हिंगोली (Hingoli Burglary case) : वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील तुकाराम महाराज गल्लीमधील व्यापाऱ्याच्या घरातून ३ मोबाईल चोरीस गेले होते. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र फिरवून एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून (Hingoli Burglary case) चोरीतील तिन्ही मोबाईल हस्तगत केले.
कुरूंदा येथील तुकाराम महाराज गल्लीतील कार्तिक किरण दळवी या व्यापाऱ्याच्या राहत्या घराची खिडीकी तोडून अज्ञात चोरट्याने २० जानेवारीला त्यांच्या घरातून ३ मोबाईल चोरून नेले होते. या प्रकरणी १५ फेब्रुवारीला अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या (Hingoli Burglary case) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील ३ मोबाईल केले हस्तगत त्याच्याकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त पास करीत असताना गुन्ह्यातील आरोपी चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी हिंगोली शहर बसस्थानक परिसरात आल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले.
या गुन्ह्यातील आरोपी विधी संघर्ष बालक असुन चौकशी अंती ३० हजार रुपयाचे ३ मोबाईल हस्तगत करण्यात आले. ही घरफोडी मुकेश गंगाधर गाडे रा. दर्गा मोहल्ला कुरूंदा याच्यासोबत मिळून केली असल्याचे विधी संघर्ष बालकाने पोलिसांना सांगितले. ही (Hingoli Burglary case) कार्यवाही पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, साईनाथ कंठे, आजम प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर यांच्या पथकाने केली आहे.