जलेश्वर मंदिरा समोरील रस्त्यावर पोलिस बंदोबस्त
हिंगोली (Hingoli Chimni Bazar) : मागील अनेक वर्षापासून जलेश्वर मंदिरा समोरील रस्त्यावर चिमणी बाजार भरविला जात होता. परंतु वाहतुक विस्कळीत होत असल्याने हा बाजार मंगळवारा बाजार भागातील शेतकरी भवनच्या पाठीमागील मोकळ्या जागेत भरविण्याचा निर्णय नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. त्यावरून मंगळवारी प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्याने आता हा बाजार मंगळवारा बाजारात भरू लागला आहे.
जलेश्वर रस्त्यावर मंगळवारी भरण्यात येणार्या चिमणी बाजारामध्ये रहदारीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे हा (Hingoli Chimni Bazar) बाजार मंगळवारा बाजार भागातील शेतकरी भवनच्या पाठीमागील मोकळ्या जागेत भरविण्यावर १२ फेबु्रवारीच्या नगर पालि केतील सर्वसाधारण सभेत एकमताने निर्णय घेण्यात आला होता. तसेच या ठिकाणी कोणीही दुकाने थाटू नये, अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा नगर पालिका प्रशासनाने दिला होता.
त्यावरून १७ फेबु्रवारी रोजी जलेश्वर मंदिरा समोरील रस्त्यावर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. काही व्यवसायीक दुकाने थाटण्याकरीता आली असता त्यांना मंगळवारा बाजारात पाठविण्यात आले. मंगळवारा बाजारात चिमणी बाजार भरल्याने ग्रामीण भागासह इतर ठिकाणाहून आलेल्या व्यापार्यांना सोयीस्कर जागा मिळाली.
जनावरांच्या बाजाराला मोठी गर्दी
हिंगोलीतील मंगळवारा बाजारामध्ये मागील अनेक वर्षापासुन जनावरांचा बाजार भरविला जातो. हे मैदान मोठे असल्याने आता चिमणी बाजार ही या ठिकाणी भरविला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आलेल्या नागरिकांना सुलभता निर्माण झाली आहे. जनावरांचा व चिमणी बाजार एकाच ठिकाणी भरल्याने हे मैदान गजबले आहे




