हिंगोली (Hingoli City Council) : मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाच्या (heavy rain) पृष्ठभुमिवर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अरविंद मुंढे यांनी १२ जून रोजी मस्तानशहा नगर भागातील नाल्याची पाहणी केली. या नाल्यावर अनाधिकृत पक्के इमारती बांधल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मस्तानशहा नगर भागातील मोठ्या नाल्याला पुर आल्याने अनेक नागरिकांच्या घरात ११ जूनला पाणी घुसले होते. त्यामुळे संसारउपयोगी साहित्य भिजुन खराब झाले. घरात पाणीच पाणी असल्याने नागरिकांना पलंगावरून बसून रात्र जागुन काढावी लागली.
हिंगोली नगरपरिषद मुख्याधिकार्यांच्या पाहणी दरम्यान नाल्यावर आढळली पक्के बांधकामे
या संदर्भात १२ जूनला या भागातील नागरिकांनी मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्याकडे निवेदन देवुन नाल्यावर असलेले अतिक्रमण काढण्याची मागणी केली. त्यानुसार मुख्याधिकारी अरविंद मुंढे, स्वच्छता निरीक्षक बाळु बांगर, स्थापत्य अभियता प्रतिक नाईक, नगर रचनाकार किशोर काकडे, दिनेश वर्मा, माधव सुक्ते, शेख अफसर यांच्यासह पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी जावुन पाहणी केली. मस्तानशहा नगर भागात मुख्य नाला असून त्यावर मोठमोठ्या इमारती बांधल्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच नाल्यावर स्लॅपही टाकण्यात आल्याचे दिसुन आले.
येत्या दोन दिवसात अतिक्रमण काढुन घेण्याची मुख्याधिकारी अरविंद मुंढे दिली तंबी
या भागात (Hingoli City Council) नगर परिषदेची घंटागाडी जाण्यासाठी रस्ता नसून नाल्यामध्ये अनेक ठिकाणी घाण अडकल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी ज्या ज्या नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यांनी येत्या दोन दिवसात काढुन घ्यावे अन्यथा (Hingoli City Council) नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेद्वारे हे अतिक्रमण काढुन संबंधितावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या भागात अतिक्रमण पाहत असताना नगर सेवक शेख शकील, आरेफ लाला यांचीही उपस्थिती होती.