देयकासाठी आ. तान्हाजी मुटकुळेंचा पाठपुरावा
हिंगोली (Hingoli City council) : शहरातील १७ प्रभागात कचरा उचलणे व त्याच्या वाहतुकीचे कंत्राट अमरावती येथील बेरोजगार क्षितिज नागरीक सेवा सहकारी संस्थेला दिले आहे. मागील पंधरा महिन्यापासून संस्थेचे जवळपास ५ कोटी रूपये देयके थकल्याने १ सप्टेंबर पासून कामबंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रश्नी आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी तात्काळ लक्ष घालून शासन दरबारी चर्चा केल्यानंतर आठ दिवसात देयकाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने (Hingoli City Council) घंटागाडी बंद करण्याचे संकट तुर्त आठ दिवसासाठी टळले आहे.
हिंगोली शहरातील (Hingoli City Council) १७ प्रभागात कचरा उचलणे व २२ घंटा गाड्यावर असे जवळपास १५० कामगार कार्यरत आहेत. मागील पंधरा महिन्यापासून संस्थेचे जवळपास ५ कोटी रूपये देयके थकले आहेत. या संदर्भात अमरावती येथील बेरोजगार क्षितिज नागरीक सेवा सहकारी संस्थेने हिंगोली नगर पालिकेला वारंवार निवेदन देऊनही देयकाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे कर्मचार्यांचे वेतन कसे करावे असा प्रश्न संस्थेसमोर उभा टाकला. त्यातच अनेक कर्मचार्यांनीही वेतनामुळे काम सोडले. वेतनाच्या अपेक्षेपोटी उपलब्ध असलेल्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली.
या कर्मचार्यांच्या वेतनासाठी संस्थेकडे पैसे नसल्याने २७ ऑगस्टला संस्थेने (Hingoli City Council) नगर परिषद मुख्याधिकार्यांना पत्र देऊन तात्काळ देयके द्यावे अन्यथा १ सप्टेंबर पासून कामबंद करण्याचा निर्णय घेतला होता. ऐन सणासुदीत घंटागाड्याचे काम थांबल्यास घराघरातील कचरा रस्त्यावर जमा होण्याची भिती बाळगली जात होती. त्यामुळे या प्रश्नी आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी तात्काळ लक्ष घालून कंत्राटदारांशी चर्चा केल्या नंतर शासनाकडे देयका करीता त्यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे येत्या आठ दिवसात देयकाचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन आ.मुटकुळेंनी दिल्याने तुर्त आठ दिवसापर्यंत तरी घंटा गाड्याचा सुरू राहण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आठ दिवसात देयके न मिळाल्यास नाईलाजास्तव घंटागाड्या बंद ठेवण्याचा निर्धार कंत्राटदाराने केला आहे.