मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत 2 लाख 78 हजार 568 महिलांचे अर्ज पात्र
हिंगोली (CM Ladki Bahin Yojana) : राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 86 हजार 415 लाभार्थी महिलांनी अर्ज भरले होते. या प्राप्त अर्जाच्या छाननीमध्ये 2 लाख 78 हजार 568 लाभार्थी महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. छाननीच्या कामाला गती आली असून हिंगोली जिल्ह्याचे 97 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यात दि. 27 ऑगस्ट, 2024 पर्यंत ॲपवर 1 लाख 79 हजार 212 अर्ज व पोर्टलवर 1 लाख 7 हजार 203 अर्ज प्राप्त झाले आहेत. ॲपवर प्राप्त झालेल्या 1 लाख 79 हजार 212 प्राप्त अर्जापैकी 1 लाख 77 हजार 572 अर्ज पात्र ठरले आहेत. तर 1089 अर्ज तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आलेल्या आहेत. 99 टक्के अर्ज ठरले आहेत. तर पोर्टलवर प्राप्त झालेल्या 1 लाख 7 हजार 203 अर्जापैकी 1 लाख 996 अर्ज पात्र ठरले आहेत, तर 3 हजार 886 अर्ज तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत. (CM Ladki Bahin Yojana) पोर्टलवरील पात्र अर्जांची टक्केवारी 94 अशी आहे.
या योजनेत आतापर्यंत 2 लाख 86 हजार 415 अर्ज प्राप्त, अर्जाच्या छाननीला गती 97 टक्के काम पूर्ण
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे (CM Ladki Bahin Yojana) राज्य शासनाने लाभार्थी निवडीचे दिलेले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे लक्ष्य आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था व नागरिक परिश्रम घेत आहेत. त्यामुळे चांगले काम करण्यास प्रशासनास मदत होत आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून अर्ज भरावेत.
“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत (CM Ladki Bahin Yojana) महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ दि.1 ऑगस्ट पासून सुरु करण्यात आले आहे. “नारी शक्ती दूत” ॲपवर अर्ज भरलेल्या अर्जदारांना पुन्हा पोर्टलवर अर्ज भरण्याची गरज नाही. ज्या पात्र इच्छुक महिला लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्यांनी www.ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज भरावेत, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.