कळमनुरी/हिंगोली (Municipal Administration) : कळमनुरी नगरपालिकेच्या वतीने दरवर्षी आठवडी बाजाराचे लिलाव करण्यात येते दरवर्षीप्रमाणे बाजार घेणाऱ्या लिलावधारकांनी अनामत रक्कम भरली. परंतु नगरपालिका प्रशासनाने (Municipal Administration) अनेक जाचक अटी लादल्याने लिलावासाठी दिलेली अनामत रक्कम परत घेत लिलावावर बहिष्कार टाकला
नगरपालिका प्रशासनाच्या (Municipal Administration) वतीने दरवर्षी आठवडी बाजाराचा लिलाव करण्यात येतो. यावर्षी सुद्धा लिलाव करण्यासाठी दि.४ जुलै रोजी नगरपालिका कार्यालयात लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लीलाबाद ९ जणांनी आपली अनामत रक्कम भरून सहभाग नोंदविला होता परंतु बोली सुरू झाली. त्यावेळेस नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की जो कोणी लिलाव घेईल त्यांना आठवडी बाजारात पूर्ण स्वच्छता करावी लागणार तसेच बाजारात येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व शौचालयाची सुविधा द्यावी लागेल, अशा प्रतिघातल्याने लिलावधारकांनी हे काम (Municipal Administration) नगरपालिकेचे आहे असे सांगून ही बाब मुख्याधिकाऱ्यांच्या कानावर टाकली परंतु मुख्याधिकाऱ्यांनीही त्यांना सांगितले की, ही अट पहिले पासूनच आहे परंतु त्याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे ही अट मान्य असेल तरच त्यांना लिलाव मिळणार असल्याचे स्पष्ट शब्दात मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे लिलावात सहभागी झालेल्या लिलावधारकांनी या नावावर बहिष्कार टाकून आपली भरलेली अनामत रक्कम परत घेतली.