खा. राहूल गांधी यांच्याविरूद्ध प्रक्षोभक विधाने
हिंगोली (Hingoli Congress) : काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात करण्यात आलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांसाठी पक्षातर्फे गुरूवारी हिंगोलीत निषेध आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेत्यांच्या या आंदोलनापेक्षा त्यांच्यातील गटबाजीचीच मोठी चर्चा ऐकायला मिळाली.
काँग्रेसचे नेते (Hingoli Congress) व लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या खा. राहूल गांधी (Rahul Gandhi) यांची अवस्था स्व. इंदिरा गांधी सारखी होऊन अशा आशयाचे विधान दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे नेते तरविंदरसिंह मारवा यांनी केल्याचा काँग्रेस पक्षाचा आरोप आहे. भाजपचे अन्य नेते व केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांनी राहूल गांधी यांना दहशतवादी संबोधिले तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहूल गांधींची जिभ छाटणार्यास ११ लाखांचे बक्षिस जाहीर केले. तसेच भाजपचे राज्यसभेतील खासदार अनिल बोंडे यांनी राहूल गांधी यांच्या चिभेला चटके दिले पाहिजे, असे वक्तव्य केल्याचे काँग्रेसच्या निवेदनात नमूद आहे. विरोधकांच्या अशा वक्तव्यांचा स्थानिक पातळीवर विरोध करावा व आंदोलने करावीत असे निर्देश पक्षाला केंद्रीय समितीकडून देण्यात आले होते. हे निषेध आंदोलन करतानाही हिंगोलीत काँग्रेसची गटबाजी मात्र स्पष्ट दिसून आली.
विधान परिषदेच्या सदस्य डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, महिला जिल्हाध्यक्ष वनिता गुंजकर, तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण माजी शहराध्यक्ष बापुराव बांगर, प्रकाशराव थोरात,सेवादल जिल्हाध्यक्ष सुदाम खंदारे, माजी नगराध्यक्ष सुधीर सराफ,कृउबा संचालक शामराव जगताप,जिल्हा उपाध्यक्ष विलास गोरे,माजी नगर सेवक अनिल नैनवानी,सरपंच गजानन थोरात,विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जुबेर मामु,माजी जि.प सदस्य गजानन देशमुख,आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष गजानन ढाकरे, महेश थोरात, कृउबा संचालक रवी डोरले, जयश्री सातव,बासीत मौलाना, हाफीज फारुखी, यश कोकरे, मुजीब कुरेशी, नेहाल कुरेशी, चंदु प्यारेवाले, जुनेद पठाण, परवेज खान, रामदास थोरात, बापुराव मगर, शेख ईसराइल, नदीम शाह, संजय डोरले आदींनी सहभाग नोंदविला तर माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वाखाली भास्कर बेंगाळ, शेख नईम शेख लाल, आबेद अली खान, के.जे. अरगडे,शेख नौमान नवेद, सतीश लोणकर,साद अहमद,पवन उपाध्याय, दाजीबा पाटील, एकनाथ शिंदे, आकाश जगताप,बापूराव पाटील, शेख बासिद, पठाण साजिद ख़ान, उल्हास पाटील, लखन पठाडे, आकाश जाधव,कालिम ख़ान, अमोल पाटिल, शेख इस्माइल, शालिक टाले, शिवप्रसाद जाधव, संतोष जाधव, संजय देखमुख, अक्षय ढकोरे, शेख शाहनवाज़,शेख आवेस,़ जाहिर पठान,आमेर बाग़बान, शेख इरफ़ान, अमोल खिल्लारी,जावेद चाऊस, मो अखिब,मो परवेज़ ,मो तोहिद, पांडुरंग, सरनाईक,रऊफ़ ख़ान, आलम ख़ान यांनी सहभाग नोंदविला.
विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात असताना (Hingoli Congress) काँग्रेसमधील गटबाजी मात्र कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे सामान्य कार्यकर्ते मात्र हतबल आहेत.