हिंगोली (Hingoli Constituency) : वसमत विधानसभा (Wasmat Assembly) मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटात असलेले माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून (Hingoli Constituency) हिंगोलीमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छूक होते.अखेर डॉक्टर मुंदडा यांनी ठाकरे गटाची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
डॉक्टर जयप्रकाश मुंदडा हे एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) शिवसेनेत जाणार असल्याची बातमी देशोन्नतीने यापूर्वीच प्रकाशित केली होती प्रवेशाचा मुहूर्त 12 जून चा ठरला होता; परंतु मुख्यमंत्री त्यावेळी उपलब्ध नसल्याने हा प्रवेशाचा कार्यक्रम रखडला होता. शिवसेने तर्फे चार वेळा आमदार राहिलेले (Jaiprakash Mundada) जयप्रकाश मुंदडा हे एक वेळ राज्याचे सहकार मंत्री होते. लोकसभेच्या दोन निवडणुकांपासून ते लोकसभेसाठी ही इच्छुक होते. 2019 च्या (Assembly Elections) विधानसभा निवडणुकीत ते वसमत मधून शिवसेने कडून लढले होते त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले ॲड शिवाजीराव जाधव यांनी बंडखोरी करून (Wasmat Assembly) वसमत विधानसभेची निवडणूक अपक्ष लढविली होती.
या निवडणुकीत शिवाजीराव जाधव हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते तर जयप्रकाश मुंदडा (Jaiprakash Mundada) तिसऱ्या क्रमांकावर एकले गेले होते. वसमत विधानसभेत सध्या अजित पवार गटाचे राजू भैया नवघरे हे आमदार आहेत तर शिवसेना शिंदे गटातर्फे राजू चापके हे विधानसभेची तयारी करीत आहेत. या परिस्थितीत डॉक्टर मुंदडा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत घेतलेल्या प्रवेशाचा विधानसभेच्या राजकारणावर काय परिणाम होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यांच्या या प्रवेशाच्या वेळी ठाणे (Lok Sabha constituency) लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, तालुकाप्रमुख राजू चापके आदींची उपस्थिती होती.