हिंगोली (Hingoli):- शहरातील रिसाला बाजार भागात अवैध गांजा(Illegal marijuana) असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने त्यांनी २२ मे रोजी मारलेल्या छाप्यात १ लाख १८ हजार ७०० रुपयाचा ४ किलो ७४८ ग्रॅम गांजा जप्त करून हिंगोली शहर पोलिसात एका विरूध्द गुन्हा दाखल केला.
अवैध रित्या वाळविलेला गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याची माहिती
हिंगोली शहरामध्ये २२ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग(Petroling) करीत असताना त्यांना रिसाला बाजार परिसरात आनंद प्रकाश पाईकराव याने अवैध रित्या वाळविलेला गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह पथकाने मध्यरात्री आनंद पाईकराव यांच्या घरावर छापा मारला असता ४ किलो ७४८ ग्रॅम वजनावा वाळलेला गांजा हा १ लाख १८ हजार ७०० रुपयाचा जप्त करण्यात आला. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंद प्रकाश पाईकराव याच्या विरूध्द एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला.
अवैध गांजा विक्री होत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांकडून अधून मधून छापे मारले जात आहेत
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सतिष ठेंगे हे करीत आहेत. विशेष म्हणजे या आरोपी विरूध्द यापूर्वीही अवैध गांजा बाळगल्याने ४ गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांब घेवारे पोलिस अंमलदार नितीने गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली आहे. अनेक ठिकाणी अवैध गांजा विक्री होत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांकडून अधून मधून छापे मारले जात आहेत. बर्याच प्रमाणात अवैध गांजा विक्रीचे गुन्हे दाखल झाले आहेत. ज्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची दमदार कारवाई सुरू असुन छापा सत्र सुरूच आहेत.