हिंगोली (Hingoli Crime) : बळसोंड शिवारामध्ये शिवरस्ता काढून देण्याच्या कारणावरून बासंबा येथील ढाले कुटूंबीयावर जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवार, रॉड, कटर व काठीने केलेल्या मारहाण प्रकरणात बासंबा पोलिस ठाण्यात १५ मार्चला रात्रीच्या सुमारास १८ जणांवर (Hingoli Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, बळसोंड शिवारातील जुम्मा लाला शेत व अकोला बायपास रस्त्यावर १० मार्च रोजी दुपारच्या सुमारास शिवरस्ता काढून देण्याकरीता हिंगोली तहसीलचे अधिकारी व कर्मचारी आले होते. परंतु शिवरस्ता काढण्यावरून वाद निर्माण झाल्याने बासंबा येथील ढाले कुटूंबीयातील अनेकांना मारहाण करण्यात आली.
ज्यामध्ये अजीम कासीम प्यारेवाले याने संजय माणिकराव ढाले यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात तलवारीने मारून जखमी केले. त्याच प्रमाणे इतर आरोपींनी देखील तलवार, कटर, रॉड, काठी व लाथा बुक्याने ढाले कुटूंबीयांना मारहाण करून (Hingoli Crime) जखमी केल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यामधील जखमींना संजय ढाले हे वाहनातून हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणत असताना अकोला बायपास रस्त्यावर कलंदर प्यारेवाले, अमिरचाँद प्यारेवाले यांच्यासह इतर ४ ते ५ जणांनी ढाले यांची गाडी अडवून त्यांच्या वाहनावर दगडफेक केली.
या प्रकरणातील जखमींवर प्रारंभी हिंगोलीतील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आला. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड रूग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामध्ये नांदेड येथील पोलिसांनी संजय ढाले यांचा जवाब घेतला. त्यावरून १५ मार्च रोजी बासंबा पोलिस ठाण्यात अजीम कासीम प्यारेवाल, बिलाल प्यारेवाले, अय्युब कासीम प्यारेवाले, रमजानलाल प्यारेवाले, चाँदबी कासीम प्यारेवाले, रिहाना सुभान चौधरी, सुभान चौधरी, मुस्ताक बिलाल प्यारेवाले, अंसार बिराम प्यारेवाले, कासीम हसन प्यारेवाले, कलंदर प्यारेवाले, अमीरचाँद प्यारेवाले, सलीम लाला प्यारेवाले व इतर ४ ते ५ जण सर्व रा. गारमाळ यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचे घटनास्थळ हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे हद्दितील असल्याने हा (Hingoli Crime) गुन्हा हिंगोली ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.