हिंगोली(Hingoli):- अवैध रित्या रेती तस्करी बद्दल मोठी ओरड सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने हट्टा पोलीस ठाणे हद्दीमध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी कारवाई(action) केली. ज्यामध्ये अवैध रेतीसह 45 लाख 20 हजार रुपयांचे तीन टिप्पर ताब्यात घेऊन हट्टा पोलीस ठाण्यामध्ये आणून उभे केले.
हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पोलीस पथकाची मोठी कारवाई
हिंगोली जिल्ह्यातील अनेक रेतीघाटावरून अवैधरित्या रेती तस्करी(Illegal sand smuggling) सुरू असल्याने मध्यंतरी लोकप्रतिनिधींनीही तक्रार केली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी डिसेंबर महिन्यात महसूल यंत्रणा, पोलीस प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये अवैधरित्या होणारी रेती तस्करी त्याचे उत्खनन आणि होणाऱ्या वाहतुकीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या कारवाईत कोणतीही कुचराई करू नये अशा सक्त सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे महसूल, पोलीस आणि आरटीओ ची यंत्रणा ॲक्शन मोडवर आली. मागील काही दिवसापासून अवैध रेती तस्करीवर मोठ्या प्रमाणात कारवाईला वेग ही आला होता.
काही दिवसापासून अवैध रेती तस्करीवर मोठ्या प्रमाणात कारवाईला वेग
वसमत तालुक्यातील ज्ञहट्टा पोलीस ठाणे हद्दीमध्ये मध्ये रेती घाटावरून रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणाहून वाहनातून रेती तस्करी केली जात होती. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने 6 जानेवारी रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास वसमत तालुक्यातील परळी दशरथे येथील पूर्णा नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून ते चोरटी मार्गाने टिप्पर मधून येत असताना पोलिसांनी ही वाहने ताब्यात घेतली. ज्यामध्ये टिप्पर क्रमांक एम. एच. 30 एल 3841, एम एच. 27 बी एक्स 2289 आणि एम. एच. 06 बि.डी 7885 या तीन टिप्पर मधील चार ब्रास रेती असा एकूण 45 लाख 20 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तीन पैकी एका टिप्पर मध्ये चार ब्रास रेती मिळाली तर उर्वरित दोन्ही टिप्पर पूर्णा नदीच्या पात्रात पथकाला अवैध रेतीसाठी आलेले आढळून आले. या प्रकरणात विशेष पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक सतीश ठेंगे यांनी हट्टा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही टिप्परच्या चालकावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव हे करीत आहेत. ही कामगिरी विशेष पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक सतीश ठेंगे, शामराव गुहाडे, सुभाष घोडके, निखिल बारवकर, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार संदीप जाधव, ज्ञानेश्वर सावळे, दिलीपराव बांगर, सुभाष घुगे यांच्या पथकाने केली आहे.