आखाडा बाळापूर (Hingoli Crime) : कळमनुरी तालुक्यातील (Akhara Balapur Police) आखाडा बाळापूर पोलिस ठाणे हद्दीतील कामठा येथील सतिष कदम यांच्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. (Hingoli Crime) दुसर्या घटनेत आखाडा बाळापुरातील माधव गोरे हे घराला कुलूप लावून परवागी गेले. याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील नगदी रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी (Akhara Balapur Police) आखाडा बाळापूर पोलिसात दोन्ही गुन्हे दाखल झाले होते.
घरफोडीतील अट्टल गुन्हेगार मुद्देमालासह जेरबंद
त्याचा तपास आखाडा बाळापूर व (Crime Branch) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केला होता. गुन्हे शाखेचे सपोनि राजेश मलपिल्लू, बाळापुरचे सपोनि सुनील गोपीनवार यांच्या पथकाने तपासचक्र फिरवून पेठवडगाव येथील संजय हनुमंता काळे व पावनमारी येथील माधव हनुमान पवार यांनी त्यांच्या नांदेड, लातूर व यवतमाळ येथील नातेवाईकासोबत चोरी केल्याची माहिती मिळताच पथकाने संजय हनुमंता काळे, माधव हनुमान पवार व त्याच्यां सोबतचे राहूल रमेश मुधळकर रा. उदगीर जि. लातूर, करण रामचंद्र मंजुळकर रा. दिग्रस जि. यवतमाळ, राजू प्रकाश मंजुळकर रा.आंबानगर नांदेड यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ज्यामध्ये नगदी ४५ हजार रूपये, १० ग्रॅमची सोन्याची गहू मन्याची पोत, १० तोळ्याची चांदीची साखळी, १५ तोळ्याचे चांदीचे कडे, २ तोळ्याचे चांदीचे जोडवे व ३ तोळ्याची चांदीची चैन या सोन्या-चांदीच्या ऐवजासह गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल, तीन मोबाईल असा एकूण ३ लाख ४१ हजार रूपयाचा मुद्देमाल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली लोखंडी टॉमी जप्त केली.
ही कारवाई (Hingoli Police) पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुनील गोपीनवार, राजेश मलपिल्लू, पोउपनि शिवाजी बोंडले, बालाजी गोणारकर, सपोउपनि मधुकर नागरे, संतोष रिठ्ठे, नागोराव बाभळे, शेख बाबर, गजानन पोकळे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, गणेश लेकुळे, शिवाजी पवार, पिराजी बेले, अरविंद जाधव, तुषार ठाकरे, दत्ता नागरे यांच्या पथकाने केली आहे.