कर्मचाऱ्यांनेच केला अपहार
आखाडा बाळापूर/हिंगोली (Hingoli Crime) : भारत फायनान्शियल इनक्लूजन लिमिटेड कंपनीची (Bharat Financial Inclusion) चार पाच वर्षापासून आखाडा बाळापूरात शाखा आहे. या शाखेत कर्मचाऱ्यांने अपहार केल्याने शुक्रवारी रात्री उशिरा फसवणूक व अपहार गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भारत फायनान्शियल इनक्लूजन लि. कंपनीची शाखा देवीगल्ली आखाडा बाळापूर येथे कार्यरत आहे. कंपनीत संगम मैनजर म्हणून कार्यरत कर्मचाऱ्यांने 2फेब्रुवारी 2023 ते 7मे 2024 कालावधीत त्याच्या अधीपत्याखाली वसुल केलेली रक्कम 10लाख 37 हजार 300 रूपय बंकेत न दाखवता त्याने स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केली. म्हणून (Bharat Financial Inclusion) भारत फायनान्शियल इनक्लूजन लि. शाखा नांदेड शाखा व्यवस्थापक दयानंद आनंदराव बोरकर यांच्या फीर्यादीवरून आरोपी अमोल अरूण मांजरमकर रा. बळीरामपूर ता. जिल्हा नांदेड विरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस (Hingoli City Police) स्थानकात गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके पुढील तपास करत आहेत.