स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची यशस्वी कामगिरी
हिंगोली (Hingoli Crime Branch) : सेनगाव तालुक्यातील लिंगदरी येथील बाळू राठोड याचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली होती. (Hingoli Crime Branch) गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल तीन दिवसांत २१०० किलोमिटरचा प्रवास करून अपहरण केलेल्या ऊसतोड मुकदमाची सुखरूप सुटका केली.
सेनगावातील सातबारा हॉटेल परिसरातून बाळू राठोड यास २१ ऑगस्टला दुपारी ४ च्या सुमारास भाऊ निवघे रा.कोल्हापूर यासह इतर पाच आरोपींनी तलवारीचा धाक दाखवून लाथा बुक्याने मारहाण करून मागील ऊसतोड पैशाच्या देवाण घेवाणीवरून कारमध्ये टाकून जबरदस्तीने पळवून नेले होते. या (Hingoli Crime) प्रकरणात विमल राठोड यांच्या फिर्यादीवरून सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा व सेनगाव पोलिसांचे दोन पथक तपासासाठी रवाना केले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासामध्ये अज्ञात आरोपीचे नाव निष्पन्न करून सदवीरसिंग टाक, मनजितसिंग टाक रा.परभणी या दोघांना अटक करून उर्वरीत आरोपींचा शोध सुरू ठेवला.
या प्रकरणात (Hingoli Crime Branch) स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्यासह सेनगावचे पोउपनि सोनकांबळे व पथक वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिडीत व्यक्तीची सुटका करणे व आरोपी अटक करण्याकरीता रवाना झाले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल तीन दिवस २१०० किलोमिटरचा प्रवास करीत बीड, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात शोधमोहीम राबवित २४ ऑगस्टला बाळू राठोड यास कोल्हापूर जिल्ह्यातून सुखरूपपणे ताब्यात घेऊन सेनगाव पोलिस ठाण्यात आणले. ही कारवाई पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सपोनि राजेश मलपिल्लू, पोउपनि मारोती सोनकांबळे, शेख बाबर, किशोर कातकडे, जीवन मस्के, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन, भिमराव चिंतारे, शिवाजी इंगोले, दत्ता नागरे यांनी केली आहे.
तलवारीचा धाक दाखवून ऊसतोड मुकदमाचे अपहरण करण्यात आले होते. (Hingoli Crime Branch) स्थानिक गुन्हे शाखेने तीन दिवसाच्या प्रवासानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून बाळू राठोड याची सुखरूप सुटका करण्यात आली.