कारमधील १६ देशीदारूच्या बॉक्ससह पावने आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
हिंगोली (Hingoli Crime) : शहरातील लकी हॉटेल समोरील रस्त्यावर एका मारोती सुझुकी स्विफ्ट डिजायर कारमधील १६ देशीदारूच्या बॉक्ससह पावने आठ लाख रुपयांचा मुद्देमाल (Crime Branch) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडुन चौघांवर गुन्हा (Hingoli Crime) दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सुचना (Hingoli Police) जिल्हा पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांनी दिल्याने पोलीस प्रशासनाकडुन प्रत्येक दिवशी अवैध धंद्यासह अवैध दारू विक्रीवर कारवाईचे सत्र सुरू आहे. वसमत शहरामध्ये अवैध रित्या मोठ्या प्रमाणात देशी दारू येत असल्याची माहिती (Crime Branch) स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाला मिळाल्याने पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी पथकाला सुचना दिल्या होत्या. नांदेड ते परभणी रस्त्यावरील लकी हॉटेल समोरील रस्त्यावर एका कारमध्ये अवैध दारुसाठा असल्याची माहिती मिळताच त्यावरून २९ जूून रोजी रात्रीच्या सुमारास पथकाने छापा मारला. मिळालेल्या माहितीवरून कार क्रमांक एमएच ३८-७८७० ही उघडुन पाहिल्यानंंतर त्यामध्ये बरेच देशीदारूचे बॉक्स मिळुन आले.
वसमत शहर पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल
पोलीसांनी वाहन (Hingoli Police) वसमत शहर पोलीसात नेल्यानंंतर पाहणी केल्यावर या कारमध्ये १६ बॉक्समध्ये ७७ हजाराच्या ८२० देशी भिंगरी संत्रा बाटल्या मिळुन आल्या. तसेच पाच लाख रुपयांची मारोती सुझुकी स्विफ्ट डिजायर कार असा एकूण ५ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात (Crime Branch) स्थानिक गुन्हे शाखेचे गौसोद्दीन हबीब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक ज्ञानेश्वर कांतराव चव्हाण, सुदर्शन देविदास चव्हाण रा. आडगाव रंजेबुवा तसेच ज्यांच्या दुकानातुन हा दारूसाठा सुरेश माणीकराव जैस्वाल यांनी नंदकिशोर द्वारकादास जैस्वाल रा. वसमत यांच्याकडुन प्रोव्हीबिशनचा माल खरेदी केल्याने चौघांविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
या प्रकरणाचा पुढील तपास शेख नय्यर हे करीत आहेत. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक जी.श्रीधर , अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, (Crime Branch) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निनरीक्षक राजेश मलपिल्लु, गौसोद्दीन हबीब शेख, गजानन पोकळे, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन यांच्या पथकाने केली आहे.