गौणखनिज संबंधी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी अनेक विभागाची घेतली बैठक
नागरिकांनी अवैध मार्गाने गौणखनिज खरेदी करू नये
हिंगोली (Hingoli Crime) : गौण खनिजाशी संबंधी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांचा परिणामकारक समन्वय साधण्यासाठी आणि अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुकीशी संबंधित अपप्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली २६ डिसेंबर रोजी महसूल, पोलीस व परिवहन विभागातील अधिकारी यांची बैठक घेतली.
या बैठकीत जिल्हाधिकारी गोयल यांनी अवैध गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीशी संबंधित अपप्रवृतीवर सक्तीने नियंत्रण व परिणामकारक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच (Hingoli Crime) जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून काम करण्याचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने जनतेने अवैध मार्गाने कोणत्याही प्रकारचे गौण खनिज खरेदी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
तसेच अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतूक अनुषंगाने उपाय योजना आखण्याकरीता अॅक्शन प्लॅनही ठरविण्यात आला. यामध्ये परिणामकारक कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी गोयल यांनी दिल्या.