अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा
जवळा बाजार/हिंगोली (Hingoli Crime) : औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला येथे १८ जुलैच्या रात्री एका व्यक्तीवर गोळीबार केल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणात हट्टा (Hingoli City Police) पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आसोला येथील बालाजी नागरे व नागोराव पावडे यांच्यात मागील काही दिवसापासून वाद सुरू होता. १८ जुलैला रात्रीच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयाजवळ नागोरावने बालाजीस मागील सहा दिवसापासून शिवीगाळ का करीत आहेस, अशी विचारणा केल्याने वादाला तोंड फुटले.
यावेळी शाब्दीक चकमक होताच मारोती पावडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता बालाजीने त्यांच्यावर गोळीबार केल्याने त्यांच्या पोटात गोळी लागून ते गंभीर जखमी झाले. ही वार्ता गावामध्ये कळताच मारोती पावडे यांना रूग्णालयात उचलून नेण्याचा प्रयत्न करीत असताना विशाल नागरे याने त्यांच्यावर चाकुचा वार करून त्यांनाही गंभीर जखमी केले. ही वार्ता गावामध्ये पसरताच मोठा जमाव जमला. सदर प्रकरणात मारोती पावडे यांना तात्काळ परभणी येथील रूग्णालयात हलविण्यात आले. या (Hingoli Crime) प्रकरणात नागोराव पावडे यांनी रितसर फिर्याद दिली.
ज्यामध्ये नागोरावने मारोती पावडे यास तू मागील सहा दिवसापासून गावातील मराठा समाजाला शिवीगाळ का करतो, असे विचारल्याच्या कारणावरून आरोपीतानी गैरकायद्याची मंडळी जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून हातात बेकायदेशीररित्या तलवार, चाकु व बंदूक घेऊन मारोती पावडे यांना जखमी करून जिवे मारण्याच्या उद्देशाने बंदुकीचा फायर केल्याने मारोती पावडेला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला असता उपस्थित साक्षीदार हे त्यांना उचलत असताना विशाल नागरे या आरोपीने त्याच्या जवळील चावूâने नागोरावला जिवे मारण्याच्या उद्देशाने वार करून जखमी केले व जातीवर शिवीगाळ केल्याने हट्टा पोलिसात बालाजी रमेश नागरे, विशाल रमेश नागरे, रमेश रूस्तूम नागरे, प्रमोद बंडू नागरे, अमोल पंढरीनाथ नागरे सर्व रा. आसोला तर्फे औंढा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. (Hingoli City Police) पोलिसांनी यातील बालाजी नागरे याला १९ जुलैला अटक केली.
या घटनेमुळे (Hingoli City Police) पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, सपोनि गजानन बोराटे, पोउपनि शिवसांब घेवारे, प्रसनजीत जाधव हे अधिकारी तळ ठोकून होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस अधिकाऱ्यासह २० दंगा काबू जवान, एसआरपीचे ३० मुख्यालयाचे ४० पोलिस कर्मचारी आसोला येथे बंदोबस्तासाठी नियुक्त केले. दरम्यान आसोला येथे शुक्रवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. यातील जखमी मारोती पावडे याच्यावर परभणी रूग्णालयात उपचार सुरू असून आ. राजूभैय्या नवघरे यांनी भेट देऊन प्रकृतीची विचारपूस केली.