हिंगोली (Hingoli Crime) : शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या परीसरात एका शेतकर्याच्या पैशाची बॅग पळविणार्या मध्यप्रदेशातील अल्पवयीन चोरट्यास २ जुलैला हिंगोली शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. हिंगोली तालुक्यातील खंडाळा येथील माणिक भिकाजी सावंत हा शेतकरी २ जुलैला भारतीय स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. पैसे काढून त्यांनी ही रक्कम बॅगमध्ये ठेवून बँकेतून बाहेर पडले असता काही अंतरावर एका अल्पवयीन चोरट्याने (Hingoli Crime) त्यांच्या हाताला झटका देऊन पैशाची बॅग पळविली. यावेळी सावंत यांनी आरडा ओरड केली.
मंगळवारी हिंगोलीचा आठवडी बाजार असल्याने पोलिसांची गस्त सुरूच होती. याचवेळी या भागातून (Hingoli Police) पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्या मार्गशाखाली पोलिस उपनिरीक्षक कपिल आगलावे, जमादार अशोक धामणे, धनंजय क्षीरसागर, संतोष करे, गणेश लेकुळे, सुरेश आडे यांचे पथक जात असताना रस्त्यावर सुरू असलेली आरडा ओरड ऐकूण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एका चोरट्याने बॅग पळविल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच सदर चोरटा कोणत्या रस्त्याने गेला, याचा मागोवा काढत पाठलाग करून त्याला पकडले. सदर चोरटा मध्यप्रदेशातील असल्याचे चौकशी दरम्यान स्पष्ट झाले. त्याच्याकडून पोलिसांनी पैशासह बॅग हस्तगत केली.
या बॅगमधील २९ हजार रूपये सुखरूपरित्या शेतकर्याच्या स्वाधीन करण्यात आले. या अल्पवयीन चोरट्यावर (Hingoli City Police) हिंगोली शहर पोलिसात कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे हिंगोलीतील रेल्वे स्टेशन व इतर काही मोकळ्या ठिकाणी मध्यप्रदेशातील काही कुटुंब वास्तव्य करीत असून कुटुंबातील काही सदस्य गल्लीबोळात जेवण मागत फिरत आहेत. त्यांच्याजवळ काचकोरीच्या पुड्या असून बाजारात लोकांच्या अंगावर टाकून त्यांच्याजवळचे साहित्य पळवित आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे असे आवाहन (Hingoli Police) पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.