कळमनुरी/हिंगोली (Hingoli Crime) : जेवण करण्यासाठी आपल्या मित्रांसोबत जाणाऱ्या (Kalmanuri Accident) युवकाचा मोटरसायकलवर ताबा सुटून झाडाला जोरदार धडक लागल्याने एका जणांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यासोबतच असलेल्या मित्रांनी जखमींना तात्काळ (Kalmanuri Hospital) कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात आणले. परंतु काही लोकांसोबत दिवसा भांडण झाले. त्यांना बोलावून त्यांचा घात केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त करीत याप्रकरणी खुणाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
नातेवाईकांकडून घातपाताचा संशय
माहितीनुसार, चाफना तेथील राहणारे शेख सिद्धीक आगामीया यांचे दि.९ जुन रोजी वाळु वरून वाद होऊन भांडणे झाली होती. यात शेख सिद्धीक हे जखमी झाले होते. यानंतर परत मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी दिल्याने ते पुन्हा रात्री आठ वाजता (Kalmanuri Crime) कळमनुरी येथे काही लोकांसोबत आले. त्यानंतर रात्री काही मित्रांसोबत पार्टी ही झाली त्यानंतर दोन मित्रासोबत जेवणासाठी जात असताना हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील चोपण येथे मोटर सायकलचा दाबा सुटून एकाच झाडाला जोरदार धडक होऊन, या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले.
खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
सोबत असलेल्या दोघ्या मित्रांनी त्यांना एका खाजगी वाहनाने दाखल केले. परंतु (Kalmanuri Hospital) रुग्णालयातील डॉक्टरांनी शेख सिद्धीक यांना मृत घोषित केले तसेच त्यांच्या सोबत असलेल्या एका युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मयताच्या कुटुंबीयांनी हा अपघात नसून घातपात झालेला आहे. या (Kalmanuri Crime) प्रकरणी खुणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत (Kalmanuri Hospital) रुग्णालयात मृतदेहाचे शविच्छेदन थांबविले होते.
घटनेची सखोल चौकशी करणार: पोलीस निरीक्षक मोहन भोसले
मोटर सायकलचा अपघात होऊन एक जण ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. मयताच्या नातेवाईकांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली. या (Kalmanuri Accident) प्रकरणी अपघात झाला असून, यावेळी त्याचे दोन मित्र त्यांनीच या अभ्यासाची माहिती देऊन जखमींना रुग्णालयात (Kalmanuri Hospital) आणले. तरीही याप्रकरणी सर्वांचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासण्यात येणार आहे. यामध्ये जर कोणी दोषी आढळले तर गय केली जाणार नसल्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी यावेळी दिले.