जवळा बाजार/हिंगोली (Hingoli Crime) : येथील बस स्टैंड वर असलेल्या सोनवणे ट्रेडिंग कंपनी या दुकानातून दुपारी चारच्या सुमारास गल्ल्यामधून चोरट्याने दोन लाख रुपये लंपास केले आहेत. येथील बस स्टैंड वर गोपाळ बबनराव सोनवणे यांचे सोनवणे ट्रेडिंग कंपनी हे पशुखाद्याचे दुकान आहे. बँकेत पैसे भरण्यासाठी त्यांनी दोन लाख रुपये मधून गल्ल्यात ठेवले होते. मात्र त्यादरम्यान शेजारील मेडिकल स्टोअर्स मध्ये काही कामासाठी गेल्यानंतर वापस येऊन पाहिले असता गल्ल्यातील दोन लाख रुपये लंपास झाल्याचे त्यांना समजले.
याप्रकरणी त्यांनी जवळाबाजार पोलीस चौकीला तक्रार दिल्यानंतर फौजदार माधव जिव्हारे व जमादार इम्रान सिद्दिकी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याप्रसंगी चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र (Hingoli Crime) गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.