४४ गोवंश जनावरे पोलिसांनी पकडली
हिंगोली(hingoli):- शहरातील पेन्शनपुरा, कुरेशी गल्ली भागात काही घरामध्ये गोवंश जनावरे (Bovine animals) कत्तलीसाठी आणल्याची माहिती शहर पोलिसांना मिळताच ७ मे रोजी रात्री १० च्या सुमारास जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे(Local Crime Branch) पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, बोधगिरे, पोलिस उपनिरीक्षक कपिल आगलावे, संभाजी लकुळे, अशोक धामणे, धनंजय क्षिरसागर, संजय मार्के यांच्यासह पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे ४४ गोवंश जनावरे आढळुन आली.
यानंतर रात्रीच ही जनावरे हिंगोली शहर ठाण्यात आणण्यात आले. ही जनावरे कोणाच्या मालकीची व त्यांचे दाखले सादर करण्याच्या सूचना पोलिसांनी सबंधीतांना दिल्या. सदर गोवंश जनावरे गोशाळेत (cowshed) पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या