हिंगोली(Hingoli):- वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस जमादार संजय गोरे याने पोलिसांकडे प्राप्त झालेली तक्रार अर्ज मिटवून घेण्यास व गुन्हा दाखल न करण्यास ५ हजार रूपयाची लाच (bribe)वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात स्विकारली होती. ज्यामध्ये त्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले होते. त्यामुळे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस जमादार संजय गोरे याच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले निलंबनाचे आदेश
वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत खांडेगाव येथील एका व्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. जमादार संजय गोरे याने सदर तक्रार अर्ज (application) मिटवून घेण्यास व यामध्ये गुन्हा दाखल होऊ नये यासाठी तक्रारदाराकडे ५ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्यावरून ५ ऑगस्टला वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात ५ हजाराची लाच घेताना एसीबीचे पोलीस उपाधीक्षक विकास घनवट यांच्यासह पथकाने जमादार विलास गोरेला रंगेहात पकडले होते. सदर प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिसात गुन्हा (Crime)दाखल होऊन न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. याबाबतचा अहवाल एसीबीने पोलीस अधिक्षक कार्यालयाकडे पाठविल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी तात्काळ पोलीस जमादार संजय गोरे याच्या निलंबनाचे आदेश काढले आहे.