डोंगरकडा/हिंगोली (Hingoli Crime) : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे योगेश रोडे यांच्या ज्वेलर्स दुकानाचे शटर वाकवून दुकानातील ४५९ ग्रॅम चांदीचे ४०६२१ रूपयाचे दागिने (Hingoli Crime) चोरून नेले होते. याप्रकरणी आ.बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखा व आखाडा (Hingoli Police) बाळापूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हा गुन्हा उघड करून चोरीतील चांदीचे दागिने जप्त केले.
स्थानिक गुन्हे शाखा व आ. बाळापूर पोलिसांची संयुक्त कामगिरी
२५ जूनला दरोड्याच्या तयारीत असणार्या सहा चोरट्यांच्या टोळीचा पाठलाग करून त्यातील तिघांना (Hingoli Police) पोलिसांनी ताब्यात घेतले. राजू गणेश पवार रा. इंदिरा नगर कळमनुरी यासह इतर दोन अल्पवयीन विधी संघर्ष बालकाचा यामध्ये समावेश होता. स्थानिक गुन्हे शाखा व आखाडा बाळापूर पोलिसांनी तपासचक्र फिरवून आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर ज्वेलर्स दुकानचे शटर फोडून चांदीचे दागिने चोरून नेल्याची त्यांनी कबुली दिली. ज्यामध्ये चांदीचे ब्रासलेट, चैन, मुकुट असा ४५९ ग्रॅम वजनी चांदीचा मुद्देमाल ४०६२१ रूपयाचा जप्त केला. या आरोपींची अधिक विचारपूस केली असता त्यांनी (Hingoli Police) पोलिस ठाणे पूर्णा जिल्हा परभणी हद्दीतही घरफोडीचा (Hingoli Crime) गुन्हा केल्याची कबुली दिली.
चांदीचा मुद्देमाल जप्त
ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलिस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, शिवाजी बोंडले, सहाय्यक फौजदार नागरे, नागोराव बाभळे, रामदास ग्यादलवाड, शेख बाबर, गजानन पोकळे, प्रभाकर भोंग, विजय जाधव, शेख अन्सार, बेले, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन, शिवाजी पवार, हरी चव्हाण यांच्यासह आखाडा बाळापूर पोलिस (Hingoli Police) व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली.