हिंगोली (Hingoli Crime) : वसमत शहरामध्ये एका २८ वर्षीय विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली असता तिला गोळ्या देऊन गर्भपात केल्याने वसमत शहर पोलिसात शनिवार रोजी रात्री तिघांवर (Hingoli Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, परभणी येथील एका २८ वर्षीय महिलेचा वसमत येथील तरूणासोबत विवाह झाला होता. काही वर्षामध्येच तिच्या पतीचे निधन झाल्याने वसमत येथील शेख समीर शेख युनूस या तरूणाने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जवळीकता साधली. (Hingoli Crime) त्यानंतर तिच्यावर वारंवार अधुनमधून अत्याचार केल्याने सदर महिला गर्भवती राहिल्यामुळे शेख समीर याच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी महिलेला शिवीगाळ करून (Forced abortion) जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला.
या प्रकरणामुळे गांगारून गेलेल्या विधवा महिलेने थेट (Hingoli Police) परभणी पोलिस ठाण्यात धाव घेऊन रितसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला; परंतु सदरील घटना वसमत शहर पोलिस ठाणे हद्दीत घडल्याने दाखल केलेला गुन्हा वसमत शहर पोलिसांकडे वर्ग केला. या प्रकरणात शेख समीर शेख युनूस, शेख युनूस शेख खाजा, शेख रफीक शेख युनूस सर्व रा.छोटा तलावाजवळ रविवारपेठ वसमत या तिघांवर (Hingoli Crime) गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास (Hingoli Police) पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले हे करीत आहेत.