हिंगोली (Hingoli Crime) : जिल्हाभरात अनेक ठिकाणी अवैध मटका जुगार सुरू असल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी छापे मटका जुगारावर छापे मारून गुन्हे (Hingoli Crime) दाखल करण्यात आले आहेत.
औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ येथे मोहन पानसेंटरजवळ २० ऑगस्टला जवळा बाजार चौकीचे इमरोद्दीन सिद्दीकी यांनी मिलन डे मटका जुगारावर छापा मारून मोबाईलसह नगदी असा एकूण ११ हजार ९४० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी औंढा ना.पोलिसात मोहन मारोती डुबे रा.पुरजळ या पानटपरी चालकावर गुन्हा दाखल केला. हिंगोली शहरातील जुना मोंढा भागातील आशा सायकल स्टोअर्स समोर संतोष करे यांनी टाईम बाजार मटका जुगारावर छापा मारून नगदी १४५० रूपये जप्त केले.
हिंगोली शहर पोलिसात सोहेब सलीम गौरी रा.हरण चौक हिंगोली याच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच हनुमान नगरातील कनक बारच्या पाठीमागे स्थानिक गुन्हे शाखेचे किशोर सावंत यांनी टाईम बाजार मटका जुगारावर छापा मारून नगदी १७०० रूपये जप्त करून (Hingoli police) हिंगोली शहर पोलिसात शेख रफीक शेख इब्राहिम रा. रिसालाबाजार हिंगोली याच्यावर गुन्हा (Hingoli Crime) दाखल केला.
हिंगोलीतील अनाज मंडी परिसरातील वाटीका हॉटेलच्या पाठीमागील बाजूस मिलन डे मटका सुरू असताना (Hingoli police) पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथक क्रमांक २ मधील दिपक पडोळकर यांनी छापा मारून नगदी १८७० रूपये व मोबाईल जप्त केला. हिंगोली शहर पोलिसात अनिल सोपानराव सानप रा. साळणा याच्यावर (Hingoli Crime) गुन्हा दाखल केला.
मध्यंतरी नांदेड परीक्षेत्रात (Hingoli police) विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पदभार स्विकारला. त्यावेळी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे फर्मान त्यांनी काढले. जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नुकताच पदभार स्विकारला असून त्यांनीही अवैध धंद्याविरूद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याने आता ठिकठिकाणी छापे मारले जात आहेत. त्यामुळे सध्यातरी अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.