औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल
हिंगोली (Hingoli Crime) : औंढा नागनाथ तालुक्यातील ३० वर्षीय तरूणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी कळमनुरी तालुक्यातील निमटोक येथील एका तरूणासह तिघांवर (Hingoli Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, (Aundha Nagnath Police) औंढा नागनाथ तालुक्यातील एका तरूणीसोबत निमटोक येथील रामभाऊ नारायण खुडे याने सन २०२० मध्ये ओळख निर्माण केली होती. त्यानंतर तिच्यासोबत या ओळखीतून तिला लग्नाचे आमिष दाखवून रामभाऊने २५ ऑक्टोंबर २०२० ते २५ जून २०२४ या दरम्यानच्या कालावधीत मागील चार वर्षात तरूणीच्या नातेवाईकाकडे येऊन तिच्याकडे वेळोवेळी अत्याचार केला. तसेच जाफराबाद, बारामती या ठिकाणीही तरूणीला नेवून अत्याचार केल्याने ती परभणी येथे राहण्याकरीता गेली.
मागील काही दिवसापूर्वी रामभाऊ यांचा भाऊ माऊली खुडे व वडील नारायण खुडे यांनी तरूणीशी मोबाईलवर संवाद साधून रामभाऊची सोयरीक मोडल्याने हुंड्याचे नुकसान झाले असे म्हणून तिला शिवीगाळ करून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे भयभीत झालेल्या तरूणीने परभणी मोंढा पोलिस ठाण्यात जाऊन या घटनेबाबत रितसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तक्रारीची नोंद घेऊन हे प्रकरणी (Aundha Nagnath Police) औंढा नागनाथ पोलिसांकडे वर्ग केले. यावरून औंढा नागनाथ पोलिसात रामभाऊ नारायण खुडे, माऊली नारायण खुडे, नारायण खुडे या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वाघमारे हे करीत आहेत.