हिंगोली (Hingoli Crime) : हिंगोली आणि वसमत शहरामध्ये दोन ठिकाणी पोलिसांनी तलवार जप्त करून दोघांवर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवैधरित्या शस्त्र बाळगणार्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत.
हिंगोली शहरातील रिसाला बाजार भागात दिलीप शिवाजी वानखेडे या व्यक्तीच्या घरामध्ये तलवार असल्याची माहिती मिळाल्याने ५ डिसेंबरला हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाने मारलेल्या छाप्यात दिलीप वानखेडे याच्याकडून तलवार जप्त केली. वानखेडे याने सदरील तलवार लोकामध्ये दहशत निर्माण होईल अशा पद्धतीने लपवून ठेवलेली मिळून आली. याप्रकरणी अजरूजमाँखाँ पठाण यांनी हिंगोली शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
वसमत शहरात बसस्थानकात विजय बबनराव वाव्हळे रा.सती पांगरा ता.वसमत याला एका लोखंडी तलवारीसह पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने एका मॅनमध्ये घातक शस्त्र तलवार व दोरी जवळ बाळगल्याने त्याच्यावर संदीप जोंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास शेख नय्यर हे करीत आहेत.