हिंगोली (Hingoli Crime) : जवळा बाजार ते हट्टा रस्त्यावर जवळा बाजार येथे तसेच लिंबाळा मक्त औद्योगिक वसाहत भागात दोन ट्रॅक्टर ट्रॉली अवैध रेतीसह पकडून गुन्हे दाखल (Hingoli Crime) करण्यात आले. या दोन गुन्ह्यात ट्रॅक्टर ट्रॉलीसह ११ लाख ९ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
२० ऑगस्टला पोलिस उपनिरीक्षक माधव जिवारे, नाईक, सिद्दीकी, शेख मुजीब यांच्या पथकाने जवळा बाजार गावातील बैल बाजारात कालूभाई यांच्या आरामशीन जवळ ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.३८- व्ही.५४६८ यामधून रेती नेण्यात येत असल्याचे निदर्शनास येताच चालकाकडे गौणखनिजाचा परवाना पोलिसांनी विचारणा केली; परंतु त्याच्याजवळ कोणताही परवाना नसल्याने ट्रॅक्टर ट्रॉली पोलिस ठाण्यात आणण्यात आली. याप्रकरणी माधव जिवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक अनंता ज्ञानदेव राखोंडे रा.नालेगाव याच्यावर गुन्हा दाखल केला. या (Hingoli Crime) गुन्ह्यात ५ लाख ५० हजाराचे ट्रॅक्टर व २ लाख रूपयाची ट्रॉली आणि ६ हजार रूपयाची एक ब्रास रेती असा एकूण ७ लाख ५६ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास ई.एफ.सिद्दीकी हे करीत आहेत.
तसेच लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यावर २१ ऑगस्टला स्थानिक गुन्हे शाखेचे किशोर कातकडे यांच्यासह पथकाने ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.३८-बी.३६९५ यामधील ३ हजाराची अर्धा ब्रास रेती पकडली. ज्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीसह ३ लाख ५३ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसात सय्यद नफीस सय्यद अली रा.लिंबाळामक्ता या ट्रॅक्टर चालकावर (Hingoli Crime) गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुधीर ढेंबरे हे करीत आहेत.