हिंगोली (Hingoli Crime) : एमआयएमच्या पदाधिकार्यांनी २८ जूनला महात्मा गांधी चौकात हम दो हमारे बाराह या चित्रपटाच्या विरोधात निषेध आंदोलन करून घोषणाबाजी केल्याने जमावबंदी आदेशाचे (curfew order)उल्लंघन केल्या प्रकरणी १८ जणांवर गुन्हा (Hingoli Crime) नोंदविण्यात आला.
या प्रकरणी (Hingoli Police) हिंगोली शहर ठाण्याचे संजय तोडेवाले यांनी तक्रार दिली. ज्यामध्ये एमआयएमचे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यख वाजीद बेग मुसा बेग, एमआयएमचे जिल्हा सचिव इमरान खान, मोहसीन रजा, मुफ्ती शफीकखान, सय्यद जमीर सय्यद बशीर, मुश्ताक प्यारेवाले, शेख आसिफ शेख शरीफ, शेख फारूख शेख पाशा सर्व रा. मस्तानशहा नगर, गारमाळा, पलटन यासह इतर आठ ते दहा जनांनी एकत्र जमून जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन महात्मा गांधी चौकात घोषणाबाजी करून निषेध आंदोलन केल्याने (curfew order) जमावंबदी आदेशाचे व पोलिसांनी दिलेल्या लेखी सीआरपीसी १४९ नोटीसचे उल्लंघन केल्याने (Hingoli Police) हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल (Hingoli Crime) करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जाधव हे करीत आहेत.