हिंगोली (Hingoli Crime) : जिल्ह्यात दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. ३० नोव्हेंबरला २० लाख ६८ हजार रूपयाचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अनेक दाखल झालेल्या (Hingoli Crime) गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्याची संकल्पना जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी राबविली आहे. त्या अनुषंगाने ३० नोव्हेंबरला फिर्यादीस परत करण्यात आला. ज्यामध्ये जिल्ह्यातील एकूण चार गुन्ह्यातील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी असे २ लाख ६८ हजार रूपये, १८ लाख रूपये १४ वाहने असा एकूण २० लाख ६८ हजार रूपयाचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत देण्यात आला. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पदभार स्विकारल्यापासून अशा प्रकारच्या मोहिमेत आतापर्यंत एकूण जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ५२ लाख ५४ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे.
ही (Hingoli Crime) कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास भुसारे, सुरेश दळवे, राजकुमार केंद्रे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, प्रेमदास चव्हाण यांनी यशस्वी पार पाडली आहे.