जवळा बाजार, हिंगोलीत तरूणीवर वारंवार अत्याचार
हिंगोली (Hingoli Crime) : लग्नाचे आमिष दाखवून विदर्भातील एका २८ वर्षीय युवतीवर वारंवार अतिप्रसंग केल्याने ती गर्भवती राहिल्याप्रकरणी युवकासह तिघांवर (Hingoli Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सुत्राने दिलेली माहिती अशी की, औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील विश्वजीत बाबुराव गायकवाड या युवकाने विदर्भातील एका २८ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान जवळा बाजार व हिंगोली येथे वारंवार अतिप्रसंग करण्यात आला. त्यामुळे सदरील युवती गर्भवती राहिली.
लग्नाचे आमिष दाखवून दिला नकार
यावेळी युवतीने विश्वजीतला लग्नासाठी तगादा लावला असता त्याने तिला नकार दिला. त्यामुळे हतबल झालेल्या या तरूणीने ५ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास थेट हट्टा पोलिस ठाण्यात धाव घेऊन रितसर तक्रार दिली. त्यानुसार विश्वजीत बाबुराव गायकवाड याच्यासह अन्य दोघांवर (Hingoli Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, शेख मदार हे करीत आहेत. दरम्यान, विश्वजीत गायकवाड हा एका प्रार्थना स्थळामध्ये असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.