नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते नागरिकांना केले बहाल
हिंगोली (Hingoli Cyber cell) : जिल्ह्यात अनेक नागरीकांचे मोबाईल हरविल्याने पोलिसांनी तपासचक्र फिरवून जवळपास ८ लाख रुपयाचे ५२ मोबाईल शोध घेऊन ताब्यात घेतले. गुरूवारी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते गहाळ झालेल्या नागरीकांचे मोबाईल त्यांना देण्यात आले. हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक नागरीकांचे वेगवेगळ्या ठिकाणाहून मोबाईल चोरीस गेल्यानंतर त्या संदर्भात ऑनलाईन तक्रारी करण्यात आल्या होत्या.
त्याअनुषंगाने जिल्हा पोलिस दलाच्या (Hingoli Cyber cell) सायबर सेलमार्फत याची तपासणी केली जात होती. गहाळ झालेले मोबाईल काहीजण पुन्हा वापरात घेत असताना त्या संदर्भात सायबरसेलला या बाबतची माहिती मिळताच शोध मोहीमेव्दारे सदर मोबाईल हस्तगत केले जातात. हिंगोली जिल्ह्यात अनेक मोबाईल हरविल्याबाबतच्या नोंदी झाल्या होत्या. त्यामुळे हिंगोली सायबरसेलने ८ लाख रुपयाचे ५२ मोबाईल शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले होते.
2 डिसेंबर रोजी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते नागरीकांना हरवलेले मोबाईल परत देण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अंबादास भुसारे, सुरेश दळवे, केंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्यासह सर्व पोलिस ठाण्याचे ठाणेदार, शाखाधिकारी उपस्थित होते. या (Hingoli Cyber cell) मोहीमेचा शोध सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, दत्ता नागरे, इरफान पठाण, मारोती काकडे, प्रदिप झुंगरे, प्रणिता मोरे यांनी शोध घेतला आहे.