हिंगोली तालुक्यातील दाटेगाव येथील शेतकरी सायबर सेलच्या पथकाची कामगिरी
हिंगोली (Hingoli Cyber crime) : तालुक्यातील दाटेगाव येथील एका शेतकर्याने पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) फ्राॅड संदेश ओपन केल्याने त्यांच्या बँक खात्यातून ३३ हजार रूपये सायबर चोरट्यांनी पळविले होते. याबाबत शेतकर्याने १९३० या सायबर हेल्प लाईनवर तक्रार नोंदविली असता कायदेशीर प्रक्रिये नंतर शेतकर्याचे ३३ हजार रूपये (Hingoli Cyber crime) सायबर सेलच्या पथकाने मिळवून दिले.
दाटेगाव येथील गणेश नामदेव माने याने (PM Kisan Yojana) पीएम किसान योजनेचा फ्राॅड संदेश उघडल्याने त्याच्या खात्यावरील ३३ हजार रूपये सायबर चोरट्यांनी परस्पर वळविले होते. या शेतकर्याने तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाईनवर फोन करून तक्रार नोंदविली. तसेच (Hingoli Cyber crime) हिंगोली सायबर सेल येथे येऊन माहिती दिली होती. त्यानुसार सायबर सेलच्या पथकाने व पोलिस अंमलदाराने योग्य ती ऑनलाईन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माने यांना ३३ हजार रूपये परत मिळवून दिले.
अशा कोणाचीही फसवणूक झाल्यास त्यांनी तात्काळ १९३० नंबर डायल करावा किंवा cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन तक्रार नोंदवावी असे आवाहन केले.
ही कामगिरी पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली (Hingoli City Police) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, दत्तात्रय नागरे, इरफान पठाण, प्रदीप झुंगरे, मारोती काकडे, प्रणिता मोरे यांच्या पथकाने केली आहे.